आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Plumber To State Minister Know About Vijay Sampalas History

जाणून घ्या, प्लंबर ते मंत्रिपदापर्यंतचा प्रवास, 10 वर्षे सौदी अरबमध्ये केले लेबरचे काम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्रीपदाची शपथ घेणारे सांपला यांचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर होता. सुरूवातीला सौदी अरब येथे लेबर म्हणून काम करताना सापला यांनी प्लंबींगचेही काम शिकून घेतले होते.
सांपला 16 वर्षाचे असतानाच त्यांच्या वडीलांचे निधन झाले. तेव्हा त्यांचे भाऊ 18 वर्षांचे होते. शिक्षण सोडण्यासोबतच कुटुंबाची जबाबदारीही त्यांच्यावर येऊन पडली होती. तेव्हा त्यांच्या भावाने नातेवाईकांकडून 20 हजार रुपये एकत्र केले आणि 1980 मध्ये लहान भाऊ विजय सांपला यांना काम करण्यासाठी सौदी अरबला पाठवले. अरब देशांमध्ये त्यांनी 10 वर्षांपर्यंत लेबरचे कामक केले. या दरम्यान त्यांनी प्लंबरचे काम शिकून घेतले आणि या व्यवसायातून चांगले पैसे कमावले. 10 वर्ष अरबी देशांमध्ये राहिल्यानंतर 1990 ला ते भारतात परतले. या कामाने त्यांना आर्थिक स्थैर्य लाभवे आणि त्यांच्या मेहनतीमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. घरी परतल्यानंतर सांपला यांनी होशीयारपूरमधून हार्डवेअर आणि सिमेंटचे काम करण्यास सुरूवात केली. मेहनती व्यक्तीसोबतच सापला एक यशस्वी राजकारणी आहेत आणि आता हा प्लंबर मोदी सरकारमध्ये मंत्री आहेत.

सांपला यांचा राजकीय प्रवास
पंजाबच्या दलित राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणारे विजय सांपला खुप मेहनती आणि मनमिळाऊ आहेत. त्यांनी त्यांची पहिली निवडणूक 1997 मध्ये सरपंचपदासाठी लढली होती. 1990 मध्ये सौदी अरबवरून परतल्यावर 1994 ला सांपला भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते होते. लोकसभा निवडणूकीत पक्षाने 2014 मध्ये त्यांना होशीयारपूर मतदार संघातून तिकिट दिले. या निवडणूकीत सांपला यांनी काँग्रेसचे उमेदवार मोहिंदर सिंह केपी यांच्यावर विजय मिळवला.
विजय सांपला - भाजपाचे दलित कार्ड
पंजाब निवडणूकीत दलित कार्ड खेळण्याच्या तयारीत असलेल्या भाजपाने दलित चेहरा असलेले विजय सांपला यांना मंत्रिमंडळात सामिल करून घेतले आहे. विजय सांपला पहिल्यांदा होशियारपूर येथून लोकसभेचे खासदार म्हणून निवडणून आले आहेत. सांपलाच्या साह्याने पंजाबमध्ये भाजपाचा दलित समुदायाला आपल्या सोबत घेण्याचा विचार आहे.