आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • PM Candidate Should Be Named After Polls, Jaswant Singh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता जसवंत सिंहही मोदींच्‍या विरोधात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदींविरोधात आता भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते जसवंत सिंह यांनीही शड्ड ठोकले आहे. नरेंद्र मोदींना निवडणूकीनंतर पंतप्रधान करण्‍यात येऊ नये, असे म्‍हणणा-या गटात जसवंत सिंह यांचा समावेश झाला आहे. भारतात निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केला जाऊ नये, असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

जसवंत सिंह म्‍हणाले, 'पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करणे ही एक नवीन प्रथा आहे. पक्षाला किती जागा मिळतील त्‍यावर नाव निश्चित होईल. आपल्‍या इथे राष्‍ट्रपती प्रणाली नाही. संसदीय प्रणालीत आवश्‍यक संख्‍याबळाची गरज असते.'

भाजपचे अध्‍यक्ष राजनाथ सिंह यांच्‍या वक्‍तव्‍यानंतर एक दिवसांनी जसवंत सिंह यांनी हे विधान केले आहे. राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी मोदींचे नाव न घेता म्‍हटले होते, की आमचा पीएमपदाचा उमेदवार जगजाहीर आहे, आता वेळ कॉंग्रेसची आहे.