आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pm Exchanges Pleasantries With Oppossion Leaders In Rajyasabha

मोदींची डिप्लोमसी: राज्यसभेत विरोधीपक्षाच्या सात नेत्यांची घेतली भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ललितगेट, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा राजीनामा आणि व्यापमं घोटाळा यावरुन संसदेत सुरु असलेल्या गदारोळादरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा वाद संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले. गुरुवारी मोदींनी राज्यसभेत विरोधीपक्षाच्या एक-दोन नाही तर सात सदस्यांची भेट घेतली. त्यात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, गुलामनबी आझाद, जयराम रमेश यांच्यासारख्या नेत्यांच्या समावेश होता. पंतप्रधानांनी भेट घेतलेल्या सात नेत्यांमध्ये सहा काँग्रेसचे होते. यावेळी मोदींनी ऑक्सफोर्ड विद्यापीठात काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी केलेल्या भाषणाचे कौतूक केले. थरुर यांचे भाषण यूट्यूबवर व्हायरल झाले असल्याचे त्यांनी विरोधीपक्ष सदस्यांच्या भेटीत सांगितले.
केव्हा आणि कोणाला भेटले मोदी
- गुरुवारी काँग्रेस आणि इतर विरोधीपक्ष सदस्य राज्यसभेत प्रश्नोत्तराचा तास चालवू देत नव्हते. सभापती हामिद अन्सारी गोंधळ शांत करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा पंतप्रधानांनी राज्यसभेत प्रवेश केला.

- सदस्यांचा गोंधळ सुरु असतानाच पंतप्रधान विरोधीपक्ष नेत्यांच्या आसनाकडे गेले तेवढ्यात सभापतींनी कामकाज तहकूब केले.

- त्यानंतर पंतप्रधान सभागृहातच थांबले. त्यांनी प्रथम माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना नमस्कार केला. त्यांच्यासोबत हस्तांदोलन केले.

- मग पंतप्रधान राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते गुलामनबी आझाद यांच्या आसनाजवळ गेले. त्यांचीही भेट घेतली.

- मोदींनी एक-एक करत काँग्रेस नेते मधुसुदन मिस्त्री, जयराम रमेश यांची भेट घेतली. मिस्त्री हे तेच नेते आहेत, ज्यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील बडोदा येथून मोदींच्या विरोधात निवडणूक लढली होती आणि पराभूत झाले होते.

- मिस्त्री यांच्यानतंर मोदी काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांच्याकडे गेले. दोघांनी हातात हात घेऊन बराचवेळ चर्चा केली.

- मोदी कर्णसिंह यांच्यासोबत बोलत असताना त्यांच्या मागे तिसऱ्या रांगेत असलेल्या माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांच्याशी त्यांची नजरानजर झाली आणि त्यांनी एकमेकांना नमस्कार केला.

- भाजप सदस्यांकडे वळत असताना त्यांनी सीपीआय नेते डी. राजा यांची भेट घेतली.

- शेवटी मोदींनी भाजप सदस्यांची भेट घेतली.