आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Smart City योजनेसह मोदींनी केले शहरविकासाच्या 3 योजनांचे उद्घाटन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते योजनांचे उद्घाटन करण्यात आले. - Divya Marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते योजनांचे उद्घाटन करण्यात आले.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी शहर विकासाशी संबंधित तीन मुख्य योजनांचे उद्घाटन केले. या तिन्ही योजना शहरी भागाशी संबंधित आहेत. यात 100 स्मार्ट सिटी बनवणे, 500 शहरांमध्ये अटल शहर पुनरुज्जीवन-परिवर्तन मिशन आणि 2022 पर्यंत शहरी भागांमध्ये सर्वांना घरे उपलब्ध करून देणे या योजनांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे या तिन्ही योजना तयार करण्यामध्ये पंतप्रधान मोदींनी स्वतः सहभाग घेतला होता. या योजनांवर आगामी पाच वर्षांत चार लाख कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या तीन योजनांना 'विकासाचे तीन इंजिन' असे नाव देण्यात आले आहे. तिन्ही योजना सरकारने वर्षभर सखोल विचार करून लाँच केल्या आहेत. त्यासठी सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि महापालिकांसह नगरपालिकांकडूनही सूचना घेण्यात आल्या.
योजनांसाठी मंजूर निधी
स्मार्ट सिटी : 48 हजार कोटी
अमृत सिटी : 50 हजार कोटी
निवास योजना : 03 लाख कोटी

नव्या युगाची नांदी
या योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रत्येकाला 2.3 लाख रुपयांचा फायदा होणार आहे. शहरविकास मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले की, या तिन्ही योजना शहरी जीवनाच्या नव्या युगाची नांदी ठरतील. वेगाने विकास होणाऱ्या भारताच्या निर्मितीमध्ये वाढत्या शहरीकरणाचे योग्य नियोजन हे एक महत्त्वाचे आव्हान ठरणार आहे. ते म्हणाले की, एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 500 शहरांसाठी एएमआरयूटी योजना लागू करण्यात येईल.

कोणत्या राज्यात किती स्मार्ट सिटीज
उत्तर प्रदेश : 13
मध्य प्रदेश : 7
तामिळनाडू : 12
महाराष्ट्र : 10
गुजरात : 6
कर्नाटक : 6
पश्चिम बंगाल : 4
राजस्थान : 4
बिहार : 3
आंध्र प्रदेश : 3
पंजाब : 3
ओडिशा : 2
हरियाणा : 2
तेलंगणा : 2
छत्तीसगड : 2
जम्‍मू - काश्‍मीर : 1
केरळ : 1
झारखंड: 1
अासाम : 1
हिमाचल प्रदेश : 1
गोवा : 1
अरुणाचल प्रदेश : 1
चंदिगड : 1
दिल्‍ली : 1

काय असेल स्मार्ट सिटीमध्ये
- संपूर्ण नियोजनासह वसलेले शहर
- सायकलसाठी स्वतंत्र लेन
- रस्त्यांवर लोकांना पायी चालता येईल.
- बागा आणि भरपूर हिरवळ
- हायटेक वाहतूक व्यवस्था
- 24 तास वीज आणि पाण्याची सुविधा
- संपूर्ण शहरात वायफाय सुविधा
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
- स्मार्ट पोलिस स्टेशन
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटो आणि अखेरच्या स्लाइडवर Video