आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Manmohan Singh Comment On Congress Pm Candidate Rahul Gandhi

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काम करण्यास आवडेल : डॉ. मनमोहनसिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधानांच्या विशेष विमानातून- आगामी निवडणुकीनंतर आपण पंतप्रधान होणार नाही, असे स्पष्ट संकेत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी शनिवारी दिले. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी या पदासाठी आदर्श पसंत असल्याचेही ते म्हणाले. राहुलच्या नेतृत्वाखाली काम करणे आवडेल, असेही डॉ. सिंग यांनी नमूद केले.

जी-20 परिषदेच्या समारोपानंतर रशियाहून परतताना पंतप्रधान पत्रकारांशी बोलत होते. या वेळी पत्रकारांनी राहुल गांधींच्या मुद्दय़ावरून त्यांना छेडले तेव्हा ते म्हणाले, ‘मी वारंवार सांगितले आहे की 2014 च्या निवडणुकीनंतर राहुल हेच पीएमपदासाठी सर्वांच्या पसंतीचे नाव असेल.’ यापूर्वीही पंतप्रधानांनी राहुल यांच्या नावाला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, थेट भाष्य त्यांनी प्रथमच केले. तिसर्‍या इनिंगसाठी तयार आहोत की नाहीत, हे मात्र त्यांनी सांगितले नाही.

टीएमसी आघाडीवर बोलताना डॉ. सिंग म्हणाले, ‘राजकारणात कोणीही कायम मित्र-शत्रू नाही. ममता एकेकाळी काँग्रेसच्या विश्वासू होत्या.’ कोळसा घोटाळ्याबाबत ते म्हणाले, मी सर्वच प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मला काहीही लपवायचे नाही. अमेरिकेच्या दौर्‍यापूर्वी योग्य निर्णय घेतले तर गुंतवणूक वाढू शकेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.


मोदी विरुद्ध राहुल’ नको
आगामी निवडणूक मोदी विरुद्ध राहुल अशी होऊ नये असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. म्हणूनच पंतप्रधानपदाचा उमेदवार काँग्रेसनेही जाहीर केलेला नाही. उलट भाजपमध्ये मोदी गट याच प्रयत्नात आहे.