आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॉन्सुनमध्ये 7 जुलैनंतर सुधारणा, जोरदार पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मॉन्सुनमध्ये 7 जुलैनंतर सुधारणा होणार असली तरी दुष्काळासारख्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार तयार आहे, असे केंद्रिय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांनी सांगितले आहे. अल-निनोचा प्रभाव कमी होऊन मॉन्सुनमध्ये सुधारणा होणार असल्याची माहिती हवामान खात्याने कृषिमंत्र्यांना दिली आहे.
मॉन्सुनचा आढावा आणि अन्न सुरक्षा कायदाच्या अंमलबजावणीवर पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आज मंत्र्यांची बैठक बोलवली होती. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, राधा मोहन सिंह आणि रामविलास पासवान उपस्थित होते.
बैठकीनंतर वार्ताहरांना माहिती देताना राधा मोहन सिंह म्हणाले, की दुष्काळासारखी परिस्थिती आणि अन्न सुरक्षा कायद्यावर चर्चा झाली. मॉन्सुनच्या आगमनाला आठवड्याभराचा विलंब झाला आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे 7 जुलैनंतर मॉन्सुनमध्ये सुधारणा होणार आहे. अल-निनो चक्रिवादळाचा पूर्वी धोका वर्तविण्यात आला होता. परंतु, या चक्रिवादळाचा प्रभाव कमी झाला आहे.
मॉन्सुनची प्रगती आणि खरीप पिकाच्या पेरणीसंदर्भात कृषिमंत्री आणि हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.
17 जूनपर्यंत देशात आलेल्या मॉन्सुनमध्ये 45 टक्के घट नोंदविण्यात आली आहे. यंदाचा मॉन्सुन सरासरी 93 टक्केच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पुढील स्लाईडवर बघा या बैठकीचा पूर्ण साईजमधील फोटो...