आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी सरांचा पीरियड : मी तर टास्क मास्टर, स्वत: काम करतो आणि इतरांकडूनही करवून घेतो..!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विद्यार्थी मोदींना: तुम्ही हेडमास्तरांसारखे असल्याचे लोक म्हणतात?
मोदी विद्यार्थ्यांना : मी तर टास्क मास्टर, स्वत: काम करतो आणि इतरांकडूनही करवून घेतो..!


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील मुलांशी संवाद साधला. काहींशी प्रत्यक्ष, तर काहींशी टीव्ही, रेडिओच्या माध्यमातून. मुख्य कार्यक्रम दिल्लीत झाला. मोदींनी सुमारे १७ मिनिट भाषण केले. नंतर सुमारे दीड तास वेगवेगळ्या राज्यांतील मुलांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. थोडे हास्यविनोद केले, काही सल्लेही दिले. मी टास्क मास्टर आहे, कामे करतो आणि करवूनही घेतो, असा संदेश मोदींनी मुलांच्या माध्यमातून मोठ्यांनाही दिला. वाचा मुलांचे प्रश्न आणि मोदींची उत्तरे...
- लहानपणी तुम्हीही खोडकर होता काय?
उत्तर : होय. गावात शहनाई वाजवणारे यायचे तेव्हा मी आणि मित्र चिंच अाणायचो. त्याने शहनाईवादन सुरू केले की आम्ही त्याला चिंच दाखवायचो. चिंच पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटायचे आणि त्याला शहनाई वाजवताच यायची नाही. कैकवेळा मारायलाही मागे लागायचा.

- गांधीनगरहून दिल्लीत आल्यावर कसे वाटते?
उत्तर : दिल्ली बघायला वेळच नाही. घरून ऑफिस आणि ऑफिसमधून घरी असेच चालले आहे. खूप कष्ट पडतात. मुख्यमंत्री असताना चुकीचे बोलले तरी खपायचे. आता नाही.

- तुमच्या आयुष्यात सर्वांत जास्त महत्त्व कोणाला? शिक्षकांना की अनुभवाला?
उत्तर : अनुभव सर्वांत चांगला शिक्षक असतो. पण अनुभवांतून धडा घ्यायला शिक्षक शिकवतो. माझ्या आयुष्यात दोहोंना सारखेच महत्त्व आहे.