फोटो: टीसीएस जपान टेक्नोलॉजी एंड कल्चरल अकादमीमध्ये जपानी ड्रमर्सबरोबर ड्रम वाजवताना नरेंद्र मोदी.
टोकियो - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जपानच्या पाच दिवसीय दौ-यात मंगळवारी टोकियो येथील सेक्रेड हार्ट यूनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना संबोधित केले. कार्यक्रमात त्यांनी ड्रम वाजवत वादकांबरोबर जुगलबंदीही केली. (व्हिडिओ पाहा शेवटच्या स्लाइडवर)
यावेळी मोदींनी अहिंसा, पर्यावरण, महिला सशक्तीकरण आणि शिक्षणाचे महत्त्व विशद केले. जीवनात सायन्स ऑफ थिं
किकं आणि आर्ट ऑफ लिव्हींगचे मिश्रण असणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. मोदी मंगळवारी जपानचे सम्राट अकिहितो यांचीही भेट घेणार आहेत. त्यापूर्वी सोमवारी मोदींनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्याशी चर्चा केली. त्यात अनेक महत्त्वाचे करार झाले. भारतात बुलेट ट्रेनसाठी मदत करण्याचे आश्वासन जपानने दिले पण अणु करारासंदर्भात यश आले नाही.
सायन्स ऑफ थिंकिंग आणि आर्ट ऑफ लिव्हिंग
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोदी म्हणाले की, या विद्यापीठात मानवशास्त्रावर जोर देण्यात आला असून, तुमचे प्राथमिक शिक्षण या विषयात झाले असल्याचा मला आनंद आहे. तंत्रज्ञानाचा कितीही विकास झाला,
आपण कितीही रोबोट तयार केले तरी मानवी संवेदना कायम राहतात. त्याशिवाय जीवन अशक्य आहे. त्यामुळे सायन्स ऑफ थिंकिंग आणि आर्ट ऑफ लिव्हींग याचे मिश्रण जीवनात हवे असे मी नेहमी म्हणतो.
मंत्रिमंडळात 25 टक्के महिला मंत्री
महिला सबलीकरणाचा विषय काझत मोदींनी आपलीच पाठही थोपटून घेतली. आपल्या कॅबिनेटमध्ये 25 टक्के महिला मंत्री असून परराष्ट्र मंत्रीही महिलाच असल्याचे मोदी म्हणाले. मुख्यमंत्री असताना महिलांसाठी केलेल्या कामांचा पाढाही त्यांनी वाचला. आपल्या भेटवस्तुंच्या लिलावात मिळालेले 78 कोटी रुपये महिलांच्या शिक्षणात खर्च केल्याचेही त्यांनी सांगितले.
बुद्ध, शांती आणि वसुधैव कुटुंबकम्
मोदींनी शांती आणि अहिंसेची चर्चा केली. ते विद्यार्थ्यांना म्हणाले भारत ही भगवान बुद्धांचीभूमी आहे, तुम्ही तेथे या तुमचे स्वागत आहे. वसुधैव कुटुंबकमची आठवण करून देत त्यांनी संपूर्ण विश्व एका कुटुंबा प्रमाणे असल्याचे म्हटले. निसर्गावर प्रेम करणे हा आपल्या संस्कृतीचाच एक भाग असल्याचे सांगत त्यांनी पर्यावरणात होत असलेल्या बदलाला मानवच जबाबदार असल्याचे म्हटले.
सोशल मीडियाचा वापर करा
मोदींनी सोशल मिडियाचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना या माध्यमातून आपल्याशी संपर्कात राहावे असे मोदी म्हणाले. मी आणि पंतप्रधान शिंजो आबे सोशल मीडियाद्वारे संपर्कात आहोत तुम्हीही याचा वापर करून माझ्या संपर्कात राहू शकता, असेही मोदी म्हणाले.
पुढे पाहा मोदींच्या दौ-याचे काही PHOTO...
ड्रम वाजवताना मोदींचा व्हिडिओ पाहा अखेरच्या स्लाइडवर