आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi Again Praises Dainik Bhaskar\'s No Negative News Campaign

नरेंद्र मोदींकडून ‘भास्कर’च्या नाे निगेटिव्ह मंडे अभियानाचा पुन्हा गाैरव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदींनी यापूर्वी एप्रिल 2015 मध्ये कॅनडाच्या दौऱ्यावर असतानाही भास्करचे कौतुक केले होते. (फाइल) - Divya Marathi
मोदींनी यापूर्वी एप्रिल 2015 मध्ये कॅनडाच्या दौऱ्यावर असतानाही भास्करचे कौतुक केले होते. (फाइल)
नवी दिल्ली- पंतप्रधान मोदींनी ‘दैनिक भास्कर’च्या ‘नो निगेटिव्ह मंडे’ अभियानाचे रविवारी पुन्हा एकदा कौतुक केले. ते म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी एका दैनिकाने मला पत्र पाठवले होते. यात म्हटले होते की, दर सोमवारी एकही नकारात्मक बातमी प्रसिद्ध करणार नाही. फक्त सकारात्मक बातम्याच असतील. आजकाल मी पाहतो, काही टीव्ही चॅनलही विशिष्ट वेळेत सकारात्मक बातम्याच देत आहेत. देशात सकारात्मक बातम्यांचे वातावरण निर्माण झाले आहे.

रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात रवी या व्यक्तीने मोदींना विचारले होते की, ‘गुड न्यूज एव्हरी डे' का नसावे? रोज कुणीतरी एक चांगली घटना पोस्ट करावी. मीडियात रोजच वाईट बातम्या ब्रेकिंग न्यूज असतात. असे का?’ मोदी म्हणाले, हे खरे की, मोठ्यात मोठ्या व्यक्तीने एक सर्वात चांगली बातमी सांगावी. त्याचा जो प्रभाव असतो तो इतर बातम्यांमुळे राहू शकत नाही. चांगल्या बातम्यांतून चांगले करण्याची प्रेरणा मिळते. चांगुलपणाला जेवढी जागा अधिक द्याल, तेवढी वाईट गोष्टींना कमी जागा मिळेल. जेवढे दिवे लावताल, तेवढा अंधकार दूर होईल. यापूर्वी मोदींनी २०१५ मध्येही या अिभयानाचे कॅनडात कौतुक केले होते.
हा होता प्रश्न
- रवी नावाच्या एका व्यक्तीने मोदींना विचारले की, रोज चांगल्या बातम्या का नसाव्यात. रोज वाईट बातम्याच ब्रेकींग न्यूजमध्ये असतात. असे का मोदींनी त्यांच्या अधिकाऱ्यांना रोज एक चांगली बातमी पोस्ट करायला सांगावे, असे ते म्हणाले.

मोदींचे उत्तर
- मोदी म्हणाले, रवी खूप रागात आहेत. खरं तर त्यांचा राग परिस्थितीवर आहे. मला त्यांना एक गोष्ट सांगायची आहे.
- तुमच्या लक्षात असेल माजी राष्ट्रपती, एपीजे अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे की,वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर केवळ पॉझीटिव्ह बातम्या असाव्यात.
- काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राचे एक पत्र मला मिळाले. त्यांनी सोमवारी एकही निगेटिव्ह बातमी द्यायची नाही, असे ठरवले असल्याचे त्यात लिहिलेले होते. सध्या काही चॅनलही ठरावीक वेळ ठरवून त्यावेळी केवळ पॉझिटिव्ह बातम्या देत आहेत.
- सध्या पॉझिटिव्ह बातम्यांचे वातावरण आहे. लोकांना चांगल्या बातम्या मिळत राहाव्यात असेच सगळ्यांना वाटते.

असे आहे नो निगेटिव्ह न्यूज कँपेन..
- 19 जानेवारी 2015 ला नो निगेटिव्ह न्यूज कँपेन सुरू झाले होते. तसे करणारे दैनिक भास्कर जगातील पहिले वृत्तपत्र आहे.
- या कँपेनमध्ये वृत्तपत्रात सोमवारी केवळ सकारात्मक बातम्यांना महत्त्व दिले जाते.
- निगेटिव्ह न्यूज केवळ माहितीसाठी आणि त्याही खास टॅगसह छापल्या जातात.