आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi Announces Higher Aid For Rain affected Farmers

अवकाळी, गारपीटग्रस्तांना दीडपटीने नुकसान भरपाई, पंतप्रधानांची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांची नासाडी झालेल्या शेतकर्‍यांना आता जास्तीची नुकसान भरपाई मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दीडपट नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे जास्तीत जास्त शेतकर्‍यांना पिकांची नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पंतप्रधान मुद्रा योजनेच्या शुभारंभप्रसंगी मोदी बोलत होते. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या पीक विम्याच्या दाव्यांचा त्वरित निपटारा करावा, असे निर्देश त्यांनी विमा कंपन्यांना दिले. त्याशिवाय नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या कर्जाची फेररचना करावी, अशी सूचनाही बँकांना केली. मोदी म्हणाले, ‘नैसर्गिक संकटांमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी कमी पावसामुळे नुकसान झाले तर या वर्षी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे फटका बसला. ’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर शेतकर्‍यांना वाढीव नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

५० ऐवजी ३३% निकष
आतापर्यंत ज्यांच्या पिकांचे ५० टक्के नुकसान झाले आहे अशा शेतकर्‍यांनाच मदत मिळत होती. हा नियम शिथिल करण्यात आला असून आता एक तृतीयांश म्हणजेच ३३ टक्के पिकांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकर्‍यांनाही भरपाई मिळेल.

भरपाईत ५०%वाढ
शेतकर्‍यांना देण्यात येणारी नुकसान भरपाई ५० टक्क्यानी वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच ज्या शेतकर्‍यांना आधी १०० रुपये नुकसान भरपाई मिळत होती, त्यांना १५० रुपये मिळेल. १ लाख रुपये असेल तर १ लाख ५० हजार रुपये मिळेल.

113लाख हेक्टरवरील रब्बी पिकांचे नुकसान अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे देशभरात झाले आहे, असे कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी मंगळवारी सांगितले होते.

कर्जफेडीला जास्त वेळ
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या कर्जाची फेररचना करण्याचे आदेश बँकांना दिले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना कर्जफेडीसाठी जास्त वेळ मिळेल.