आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PM मोदींचे काँग्रेसला पाच प्रश्न, अच्छे दिन आल्याचाही केला दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरकारच्या वर्षपूर्तीबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला अच्छे दिल आले असल्याचा दावा केला आहे. सरकार आणि सरकारच्या कामांवर टीका करण हे काही लोकांचे कामच आहे. ते लोक नेहमी सरकारची प्रतिमा खराब करण्याच्या प्रयत्नात असतात. पण अशा लोकांचे प्रयत्न बाजुला ठेवले तर, देशाचे बुरे दिन संपले असल्याचेही मोदी म्हणाले. गरिबांचे हितचिंतक असल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेसवरही मोदींनी हल्ला केली. काँग्रेसला गरिबांची एवढी काळजी होती तर मग त्यांच्या 60 वर्षांच्या कार्यकाळानंतरही देशात एवढी गरीबी का आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांना गरीबी हटवण्यापासून कोणी रोखले होते. पंतप्रधानांनी काँग्रेससह विरोधी पक्षाला पाच प्रश्नही विचारले. UNI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत. मोदी सरकारला 26 मे रोजी एकवर्ष पूर्ण झाले आहे.

पंतप्रधानांचे पाच प्रश्न
-आजही लोक बेघर का आहेत? आणि बेघर कोण आहेत-गरीब?
-शेतकऱ्यांची उत्पादकता कमी का आहे? जमीनी पडीक आहेत आणि आपल्या देशात पाणी आणि इतर बाबीही उत्तम आहेत.
-बेरोजगारी का आहे? आपली युवाशक्ती 60 वर्षांनंतरही दिशाहीन का आहे?
-आपल्यापेक्षा लहान देश आपल्या पुढे कसे निघून गेले? आपल्या एका राज्याच्या आकाराचे सिंगापूर, मलेशिया, कोरिया हे देश भारतापुढे निघून गेले आहेत, त्याचे कारण काय?
-14 कोटी लोक बँक खात्यांपासून वंचित असण्याचे कारण काय ? 6-7 कोटी छोट्या व्यापाऱ्यांना बँकिंग सुविधा का मिळाली नव्हती?

'गरीब विरोधी कोण?'याचा निर्णय देश करणार
पंतप्रधान म्हणाले की, त्यांच्या सरकारने आव्हाने स्वीकारून मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. यामुळे गरिबांचे भले होईल की नाही आणि गरीबांचे विरोधक कोण याचा निर्णय देश करेल. पंतप्रधान म्हणाले की, त्यांच्या सरकारचे धोरण गरीबांच्या विरोधात लढण्याचे आहे. ते म्हणाले, आम्हाला गरीबांनाही विश्वासू सहकारी बनवून, त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढायचे आहे आणि जिंकायचे आहे.

'धार्मिक हिंसेला थारा नाही'
पंतप्रधान म्हणाले की, त्यांचे सरकार कोणत्याही समुदायाच्या विरोधात धार्मिक हिंसा सहन करणार नाही. पंतप्रधान म्हणाले की, ते धार्मिक वक्तव्याच्याही विरोधात आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या सरकारचे काही मंत्री, भाजप आणि विहिंपचे काही नेते वारंवार वादग्रस्त धार्मिक वक्तव्ये करत असतात. असे केल्याचे अच्छे दिन येणार नाहीत, असे मोदी म्हणाले.

'एका वर्षात एकही घोटाळा नाही'
सरकारचे रिपोर्टकार्ड सादर करताना पंतप्रधान म्हणाले की, आमच्या सरकारच्या गेल्या एका वर्षाच्या कार्यकाळात एकही घोटाळा झालेला नाही. पंतप्रधान म्हणाले, आम्ही लोकांना अच्छे दिनचे आश्वासन दिले होते. घोटाळ्यांवर नियंत्रण आणत आण्ही त्याची सुरुवात केली आहे. गेल्या एका वर्षात सरकार चांगले काम करण्यात यशस्वी ठरले ाहे. आम्ही पारदर्शक सरकार देण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या सरकारवर कोणतचेही आरोप झाले नाही, असेही मोदी यावेळी म्हणाले.