आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्वी जे वर्ल्ड बँकेत काम करायचे, तेच आता रॅकिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत-मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इज ऑफ डुइंग बिझनेसमध्ये भारताच्या वाढलेल्या रँकिंगप्रकरणी सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांना पंतप्रदान नरेंद्र मोदींनी सुनावले आहे. पूर्वी जे स्वतः वर्ल्ड बँकेमध्ये काम करत होते, तेच आता रँकिंगवर प्रश्नचिन्हं उपस्थित करत असल्याचे म्हणत, नरेंद्र मोदींनी विरोधकांना फटकारले आहे. दिल्लीतील प्रवासी भारतीय केंद्रात इंडियाज बिझनेस रिफॉर्म्स कार्यक्रमात मोदींनी विरोधकांवर हा हल्ला चढवला आहे.  

काय म्हणाले मोदी...
- या ठिकाणी आनंदाचे वातावरण आहे. वर्ल्ड बँकेने इज ऑफ डुइंग बिझनेस रँकिंगच्या माध्यमातून आपल्या चांगल्या कामाची पावती दिली आहे. 
- इज ऑफ डुइंग बिझनेस मुळेच आपण इज ऑफ लाइफकडे जाऊ शकतो. 
- माझ्याकडे देशातील 125 कोटी देशबांधवांच्या जीवनात बदल घडवून आणण्याशिवाय दुसरे काहीही काम नाही. 
- भारत सध्या अशा पातळीपर्यंत पोहोचला आहे, ज्याच्यापुढे आता अगदी सहजपणे आपण सुधारणा घडवून आणू शकतो. 
- आपण एक तरुण देश आहोत. रोजगारनिर्मिती ही आपल्यासाठी संधीही आहे आणि आव्हानही आहे. 
- काही लोकांना भारत 142 व्या क्रमांकावरून 100 व्या क्रमांकावर आल्याचे काहीही वाटत नाही. त्यांना त्यामुळे काही फरकच पडत नाही. 
- यापैकी काही लोक तर असे आहेत, जे आधी वर्ल्ड बँकेमध्ये होते. ते आजही भारताच्या रँकिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. 
- जर यांनी त्यांच्या काळात भ्रष्टाचाराच्या विरोधात पावले उचलत सुधारणा घडवून आणल्या असत्या, तर त्यांनाही हे सौभाग्य लाभले असते. 
- स्वतः तर काही करत नाहीत, पण जे काम करतात त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करतात. 
- मी असा पंतप्रधान आहे, ज्यांनी वर्ल्ड बँकेची इमारतही पाहिलेली नाही. पण आधीतर वर्ल्ड बँक चालवणारे लोक येथे बसायचे. 
 
बातम्या आणखी आहेत...