आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PM नी केले जयललितांचे अभिनंदन, मोदींना संसदेत हवी AIADMK ची मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी एआयएडीएमकेच्या प्रमुख जे. जयललिता यांची निर्दोष सुुटका झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सोमवारी हायकोर्टाचा निर्णय आल्यानंतर जयललिलतांचा फोन करणाऱ्यांमध्ये पंतप्रधानांचादेखिल समावेश होता. यामागचा उद्देशही राजकीय असल्याची चर्चा आहे. तो म्हणजे भू संपादन विधेयकासह महत्त्वाच्या विधेयकांसाठी मोदींनी संसदेत जयललितांच्या पक्षाचा पाठिंबा हवा आहे. विशेषतः राज्यसभेत अल्पमतात असल्याने भाजपला एआईएडीएमकेकडून अपेक्षा आहेत.

एनडीएला संधी
जयललिता आणि त्यांचा पक्ष भ्रष्टाचाराच्या आरोपांमधून बाहेर येणे ही नरेंद्र मोदींसाठी एक खूप मोठी संधी आहे. राज्यसभेत एनडीएला संख्याबळासाठी पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे एआयएडीएमकेचे 11 खासदार त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. जयललितांच्या पक्षाचे लोकसभेत 37 तर राज्यसभेत 11 खासदार आहेत.

मोदी-जयललितांची जुनी मैत्री
जयललितांनी जेव्हा 2011 मध्ये तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ गेतली होती, त्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. तर त्याच्याच पुढच्या वर्षी जेव्हा नरेंद्र मोदी शपथग्रहण करत होते, त्यावेळी अण्णाद्रमुकच्या प्रमुख जयललिता या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. 2013 मध्ये नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या दावेदारीला पाठिंबा करणाऱ्या त्या पहिल्या मुख्यमंत्री होत्या.

भाजप नव्या मित्रांच्या शोधात
गेल्या आठवड्यातील राजकीय घटनाक्रम पाहता, मोदी आणि भाजप आता त्यांचे सहकारी आणि इतर प्रादेशिक पक्षांशी मैत्री करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते. समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर मोदी पश्चिम बंगालला पोहोचले. त्याठिकाणीही ते ममता बॅनर्जी यांच्याबरोबर एका कार्यक्रमात सहभागी झाले. त्याठिकाणी मोदींनी टीम इंडियाचा नारा दिला. त्यांच्यामते केंद्र आणि राज्य तसेच मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या ऐक्याचे ते प्रतिक आहे.

जयललितांनी केले होते कौतुक
जयललितांनीही कधीही मोदींबरोबर असलेली मैत्री लपवलेली नाही. भाजपच्या गोवा येथील कार्यकारिणीच्या बैठकीत मोदींवर प्रचाराची जबाबदारी देण्यात आली त्यावेळीच जयललिता म्हणाल्या होत्या की, वैयक्तिकरित्या मोदी माझे चांगले मित्र आहे. एक चांगला नेता म्हणून मी त्यांचा आदर करते. माझ्या शुभेच्छा नेहमी त्यांच्या बरोबर आहेत. त्यांच्या यशाचा मला नेहमीच आनंद असेल, असे जयललिता म्हणाल्या होत्या.