आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुल यांच्या टीकेवर पंतप्रधानांचा पलटवार, काँग्रेस पराभव पचवू शकली नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या 'सुट-बुट वाली सरकार' या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले, 'काँग्रेस अजूनही पराभव पचवू शकलेली नाही.' मोदी म्हणाले, याआधीच्या यूपीए सरकारच्या काळात घटनाबाह्य शक्तींच्या हातात खरी सत्ता होती. भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमीत्त राहुल गांधींनी मंगळवारी 'सुट-बुट वाली सरकारला हॅपी बर्थ डे' अशा उपरोधिक शुभेच्छा दिल्या होत्या. आज (बुधवार) त्रिशूर येथील एका कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान आणि त्यांच्या सुटवाल्या पाच-सहा मित्रांना आम्ही घाबरणार नसल्याचे म्हटले आहे.
पीएमओ सत्ता केंद्र असण्यात काय चूक
पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) सगळी सत्ता केंद्रीत झाली, आहे या टीकेवर मोदी म्हणाले, पीएम आणि पीएमओ या दोन्ही घटनात्मक संस्था आहेत. एनजीओ वरील कारवाईचे समर्थन करताना ते म्हणाले, कायदेशीर कारवाई झाली आहे आणि कोणताही देशभक्त नागरिक यावर आक्षेप घेणार नाही.
भू-संपादन कायद्याबद्दल
पंतप्रधान मोदी म्हणाले, जीएसटी आणि भू-संपादन विधेयक काही दिवसांमध्येच संमत होईल. गरीब, शेतकरी, कष्टकरी यांच्या हिताचा कोणताही प्रस्ताव असेल तर सरकार तो स्विकारेल. आम्ही स्वच्छ प्रशासन आणि बदलांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, परदेश दौऱ्यांबद्दल काय म्हणाले मोदी