आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावर्षी मोजक्‍याच देशात मोदींचे दौरे, आश्‍वासने पूर्ण करण्‍यावर असेल लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 2016 या वर्षात विदेशी दौ-यांवर कमी दिसणार आहेत. पीएमओच्‍या माहितीनुसार मोदी यावर्षी काही महत्‍त्वाच्‍या आंतरराष्‍ट्रीय परिषदांमध्‍येच सहभागी होतील व मोजक्‍याच देशांचा ते दौरा करतील. जनतेला दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्‍यासाठी ते अधिक वेळ खर्च करणार आहेत. मागील 19 महिन्‍यांमध्‍ये मोदींनी 33 देशांना भेटी दिल्‍या आहेत.
2015 मध्‍ये किती दिवस बाहेर होते मोदी...
- 2015 मध्‍ये मोदी यांनी 26 देशांचा दौरा केला. दरम्‍यान 65 दिवस ते देशाबाहेर होते.
- वर्षाच्‍या शेवटी पाकिस्‍तानातील लाहोर येथे त्‍यांनी सरप्राइज व्‍हिजिट दिली.
- 2004 नंतर भारतीय पंतप्रधानाने पाकमध्‍ये दिलेली ही पहिली भेट होती.
2016 मध्‍ये कोणत्‍या देशांमध्‍ये जाऊ शकतात मोदी?
1- स्वित्झर्लंड
- 20 ते 23 जानेवारीपर्यंत स्वित्झर्लंडमध्‍ये होणा-या वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्‍ये मोदी सहभागी होऊ शकतात.
2- यूएसए
- 31 मार्च आणि 1 एप्रिलला होणा-या न्यूक्लियर सिक्युरटी समिटमध्‍ये सहभागी होण्‍यासाठी मोदी वॉशिंग्टनला जाणार आहेत.
- येथे त्‍यांची आणि नवाझ शरीफ यांच्‍यात भेट होऊ शकते.
3- व्हेनेझुएला
- अलिप्त राष्ट्र चळवळ (NAM) मध्‍ये मोदी सहभागी होऊ शकतात.
- जुलै महिन्‍यात होणा-या परिषदेत मोदींनी सहभाग घेतल्‍यास काही लॅटीन अमेरिकी देशांचाही ते दौरा करू शकतील.
4- चीन
G-20 परिषदेत मोदी सहभागी होऊ शकतात.
- नोव्‍हेंबर महिन्‍यात ही परिषद होईल. मोदींची ही दुसरी भेट असेल.
5- लाओस
- नोव्‍हेंबर महिन्‍यात होणा-या भारत-आसियान परिषदेत मोदी सहभागी होणार आहेत.
- या दौ-याच्‍या दरम्‍यान अन्‍य काही देशांना ते भेटी देतील.
6- पाकिस्तान
- यंदा सार्क परिषद पाकिस्तानमध्‍ये होणार आहे. मोदी येथे नवाझ शरीफ यांच्‍यासह सार्क देशातील इतर नेत्‍यांच्‍या भेटी घेतील.
- सप्‍टेंबर ते नोव्‍हेंबरदरम्‍यान ही परिषद होणार आहे.
7- जपान
- इंडो-जपान परिषद यंदा टोकियोमध्‍ये होणार आहे.
- यावेळी दोन्‍ही देशात सुरक्षा, न्यूक्लियर एनर्जीबाबत करार होऊ शकतो.
- या शिवाय मोदी इराण आणि दक्षिण आफ्रिकेच्‍या दौ-यावर जाऊ शकतात.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, विरोधकांचे आरोप ? मोदींच्‍या कौशल्‍यावर काय म्‍हणाले कॉंग्रेस?