आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi Guided Bureaucrats Like A Management Guru

पंतप्रधान झाले मॅनेजमेंट गुरू, फाइल हाताळताना आयुष्याची चिंता नको

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. निमित्त होते सिव्हिल सर्व्हिस डे कार्यक्रमाचे. पंतप्रधानांचा आवेश या वेळी एखाद्या मॅनेजमेंट गुरुसारखा होता. ते अधिकाऱ्यांना म्हणाले, तणावग्रस्त व्यक्ती काहीही साध्य करू शकत नाही. विशेषत: आपल्याला देश चालवायचा असेल तर तणावमुक्त असायला हवे. अधिकारी तणावात असतील तर काम होणार नाही. काम होणार नसेल तर सर्वांनाच त्याचा त्रास होईल.

मोदी ब्युरोक्रॅट्सना म्हणाले, तुम्ही लोक खूप अभ्यास करत असाल. टाइम मॅनेजमेंटही चांगले करता. मात्र, तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवता का? आयुष्याची चिंता करणार नसाल तर फाइल हाताळतानाही त्याचे प्रतिबिंब उमटेल. तुमचे आयुष्य केवळ फाइल्सच्या अवतीभोवती नसावे. कुटुंबासोबत वेळही घालवला पाहिजे. आयुष्य रोबोटसारखे होऊ शकत नाही. तुम्ही जिथे कुठे काम करता तिथे कायम गंभीर राहण्यास सांगितले जाते काय? त्या ठिकाणी आनंद राहण्यास मनाई आहे काय? यावर उपस्थितांमध्ये हषा पिकला. यानंतर मोदी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले, काळजी करू नका, मी तुम्हाला नवीन काम देणार नाही. तुम्ही न घाबरता काम करा.
राजकीय हस्तक्षेपामुळे सिस्टिम नष्ट होते
मोदी म्हणाले, लोकशाहीमध्ये नोकरशाही आणि राजकीय हस्तक्षेप एकमेकांसोबत चालते. हे याचे वैशिष्ट्य आहे. आमदार-खासदाराला लोक निवडून देतात. राजकीय हस्तक्षेप आवश्यक आहे. मात्र, देश चालवताना राजकीय हस्तक्षेप असायला नको. यामुळे सिस्टिम नष्ट होते.

प्रत्येक समस्या सुटू शकते, त्याचा शोध आवश्यक
मोदी यांनी प्रत्येक कामात अडथळा आणण्यासाठी बदनाम ठरलेल्या नोकरशाहीला सल्ला दिला. ते म्हणाले, आम्ही नोकरशाहीतून "ऑब्स्ट्रक्शन' आणि "डिफिकल्टी' यासारखे शब्द काढावे लागतील. प्रत्येक समस्येतून मार्ग िनघाला पाहिजे. मात्र त्याचा आपण शोध घेतला पाहिजे. अकाउंटेबिलिटी, रिस्पान्सिबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी हे एआरटी सुशासनासाठी आवश्यक आहे.

सुधारणा आणि तंत्रज्ञानावर भर
सुधारणा आणि तंत्रज्ञानावर भर देणे आवश्यक असल्याचे सांगत मोदी म्हणाले, जग एम-गव्हर्नन्स किंवा मोबाइल गव्हर्नन्सचा पर्याय म्हणून पाहण्याचा दिवस लांब नाही. अशात सुधारणा आणि तंत्रज्ञानावर भर देणे आवश्यक आहे. आपले काम केवळ विभाग चालवणे हे नाही. आपल्याला सर्जनशील व्हावे लागेल. विभागाचे अाधुनिकीकरण केले पाहिजे. आपल्याला परफेक्शन आणि कॅपेसिटी बिल्डिंगला प्राधान्य द्यावे लागेल.

देशाला सामाजिक-आर्थिक एकजुटीची आवश्यकता
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृती ताज्या करत पंतप्रधान म्हणाले, देशाच्या पहिल्या गृहमंत्र्यांच्या योगदानाची आठवण करणे स्वाभाविक आहे. त्यांनी देशाला एकजूट केले. आज आपल्याला सामाजिक-आर्थिक एकजूट दाखवणे आवश्यक आहे. लोक एकमेकांच्या जवळ येतील, अशा मॉडेलवर विचार करायला हवा.