आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Has Asked Arun Jaitley To Reconsider The Budgetary Proposal Of EPF

मोदी जेटलींना म्हणाले- 60% EPF वर कर लागू करण्यावर पुनर्विचार करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (प्रोव्हिडंट फंड) 60 रकमेवर कर लागू करण्याचा प्रस्ताव सरकार मागे घेण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थमंत्री अरुण जेटलींना याबद्दल पुन्हा विचार करण्यास सांगितले आहे. देशभरातून या निर्णयाला विरोध होत होता. जेटलींच्या अर्थसंकल्पीय भाषणानूसार हा प्रस्ताव येत्या 1 एप्रिलपासून लागू केला जाणार होता.

पीएमओमध्ये उच्चस्तरीय बैठक
- सूत्रांच्या माहितीनूसार, दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान कार्यालयात उच्चस्तरीय बैठक झाली होती. त्यात ईपीएफला टॅक्सेबल करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली होती.
- आता अशी शक्यता आहे, की संसदेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना जेटली हा प्रस्ताव मागे घेऊ शकतात.
- पाच राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमुळेही सरकार दोन पावले मागे येण्याच्या तयारीत आहे.

बजेटनंतर आलेले वक्तव्य

1 - EPF वर काय वक्तव्य झाले
- बजेटमध्ये काय म्हणाले जेटली - '1 एप्रिल 2016 पासून EPF मधून 40 टक्के रक्कम काढण्यासाठी कर द्यावा लागणार नाही.'
याचा अर्थ असा की 60% EPF वर कर द्यावा लागेल.
- महसूल सचिव हसमुख अधिया म्हणाले, 'ईपीएफ खात्यातून काढलेल्या मूळ रकमेवर नव्हे तर त्याच्या 60 टक्के भागावर मिळणाऱ्या व्याजावर द्यावा लागेल.'
- जयंत सिन्हा म्हणाले, 'जर पीएफच्या जमा मूळ रकमेच्या 60 टक्के गुंतवणूक पेंशन अॅन्युटी योजनांत केल्यास करातून सूट मिळेल.'
2 - व्याजावर काय म्हणाले ?
- जेटली - पेंशन योजनेबद्दल बोलले मात्र व्याजाचा काही उल्लेख केला नाही.
- महसूल सचिव - व्याजावर कर लागेल.
- जयंत सिन्हा - 'EPF च्या पूर्ण 60 टक्के रकमेवर नाही तर त्यावर मिळणाऱ्या व्याजावर कर लागेल. जटली यावर अखेरचा निर्णय घेतील.'
पुढील स्लाइडमध्ये,
सरकारचा निर्णय श्रमिकविरोधी पाऊल : कामगार संघटनांची टीका