आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Modi Hiding Behind The Blood Of Soldiers, Doing \'dalali\' Of Their Sacrifices: Rahul Gandhi

सर्जिकल स्ट्राइक : राहुल यांचे वक्तव्य; भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्जिकल स्ट्राइकचे श्रेय घेण्यावरून राजकीय क्षेत्रात चिखलफेकीला सुरुवात झाली आहे. राजकीय फायदा लाटण्यावरून राहुल गांधी यांनी भाजपवर ‘खून की दलाली’ची टीका केली होती. त्यावरून भडकलेल्या भाजपने शुक्रवारी ‘मर्यादा आेलांडली’ म्हणत प्रतिहल्ला केला. अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपांना काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी उत्तरे देत राहुल गांधी यांचा बचाव केला.

राहुल यांच्या मुळात खोट : अमित शहा
काँग्रेस पाकिस्तान सोबत दिसत आहे

संपूर्ण देश उत्साहात दिसू लागला. काँग्रेस का नाही ? त्यांचे मूळ चुकलेले दिसते. काँग्रेस पाकिस्तानच्या निराशेसोबत दिसत आहे. दहशतवाद्यांच्या साथीदारांना वाचवण्यासाठी यूपीए चाली खेळत होते.

कोळसा, बोफोर्सची दलाली कोणी केली?
दलाली शब्द वापरून राहुल यांनी सगळ्या सीमा आेलांडल्या. ते कोणत्या दलालीबद्दल बोलत आहेत? कोळसा, बोफोर्स, २ जी मध्ये दलाली कोणी केली ? बलिदानाची दलाली कशी करतात राहुल यांनी सांगावे ?

निवडणुकीचा मुद्दा होणार : मोदींना मौत का सौदागर म्हटले होते. तेव्हा आम्ही गुजरातमध्ये दोन तृतीयांश बहुमताने जिंकलो होताे. विषाची शेती म्हटल्यावर बहुमताचे सरकार स्थापन झाले. अखेर राहुल यांची इच्छा तरी काय ?

पुढे वाचा, तडीपारांनी आम्हाला शिकवू नये : सिब्बल, अामच्या काळात चारदा सर्जिकल स्ट्राइक्स : शरद पवार यांचा दावा.... सर्जिकल स्ट्राईकवर काय म्हणाला अक्षयकुमार.... काय म्हणाला अजय देवगण.... अखेरच्या स्लाईडवर बघा व्हिडिओ....
बातम्या आणखी आहेत...