आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi Holds Off On Cabinet Reshuffle Ahead Of Budget Session

सध्‍यातरी नाही बदलणार टीम मोदी, 20 महीन्‍यांत 450 निर्णयांवर अंमल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्‍यातरी केंद्रीय मंत्रीमंडळात फेरबदल करण्‍याच्‍या तयारीत नाहीत. मंत्री चांगले काम करत आहेत, त्‍यांचे मनोबल वाढवण्‍याची गरज आहे, असे मोदी यांना वाटत आहे. त्‍यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्‍या कामगिरीचा आढावा घेतला. या वेळी ते बोलत होते.
केव्‍हा फेरबदल...
- संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्‍या आधी पंतप्रधान मोदी मंत्रिमंडळात फेरबदल करू शकतील अशा बातम्‍या समोर आल्‍या होत्‍या.
- मात्र, एका इंग्रजी वृत्‍तपत्राने एका मंत्र्याच्‍या माहितीनुसार सांगितले की, मोदींनी पीएमओच्‍या आकड्यांचा संदर्भ घेत सांगितले की, कॅबिनेटच्‍या 548 मधील 459 निर्णयांवर अंमल करण्‍यात आला आहे.
- मंत्रिमंडळ सचिवालयातील एका अधिका-याने सांगितले की, आता सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन काही महत्त्वाचे बिलं पास करण्‍यासाठी आहे.
प्रत्‍येक महिन्‍यात घेणार आढावा
- दर महिन्‍याच्‍या शेवटच्‍या बुधवारी आढावा बैठक घेण्‍यात येणार असल्‍याचेही मोदींनी सर्व मंत्र्यांना सांगितले आहे.
- शेती, पायाभूत सुविधा आणि सामाजिक व कोअर क्षेत्रातील विषयांवर ही बैठक होणार आहे.
- गेल्‍या बुधवारी झालेल्‍या बैठकीत कृषी, ग्रामीण विकास, जलसंपदा, फूड अँड पब्लिक डिस्ट्रिब्यूशन, सार्वजनिक वितरण अशा विविध विषयांच्‍या कामकाजावर चर्चा करण्‍यात आली.
का होत होती फेरबदलाची चर्चा...
- गेल्‍या आठवड्यात रॉयटर्सच्‍या एका बातमीत म्‍हटले होते की, अरुण जेटली पुन्‍हा संरक्षण मंत्री बनू शकतात.
- पीयूष गोयल यांना अर्थमंत्रीपद दिले जाऊ शकते असेही म्‍हटले जात होते.
-विकास प्रकल्पांमध्‍ये मोदींना गती हवी आहे, त्‍यासाठी फेरबदल होणार असल्‍याचे बोलले जात होते.
- बिहार विधानसभा निवडणूकीत पराभव झाल्‍यानंतर आरएसएस सरकारच्‍या प्रतिमेवर नाराज आहे.
- आरएसएसकडून दबाव आहे की, काम करू शकत नाही अशा मंत्र्यांची हकालपट्टी करा. त्‍यामुळे येणा-या निवडणूकीत सरकारची प्रतिमा सुधारेल.
- मोदी सरकारने रोजगार आणि विकासाबाबत मोठी आश्‍वासने दिली. मात्र, दीड वर्षात त्‍यावर काही काम झाले नाही.
- दोन वर्षापासून पडणारा दुष्काळ ग्रामीण विकासात गतिरोधक ठरत आहे.
मोदींनी आतापर्यंत एकदा केला फेरबदल
-
मोदी आणि त्‍यांच्‍या मंत्रिमंडळाने 26 मे, 2014 मध्‍ये शपथ घेतली.
- त्‍यानंतर केवळ एकदा नोव्‍हेंबर, 2014 मध्‍ये मंत्रिमंडळात बदल झाला होता.
- तेव्‍हा शिवसेनेचे सुरेश प्रभु आणि गोवाचे सीएम राहिलेले मनोहर पर्रिकर यांना मंत्रिमंडळात सामील केले होते.
टीम मोदीमधील मंत्री?
- 66 मंत्र्यांमध्‍ये 13 उत्तर प्रदेशातून.
- 8 बिहारमधून.
- 7 महाराष्ट्र.
- 8 महिलांचाही समावेश.
- 34 मंत्री स्पेशलिस्ट, त्‍यामध्‍ये 15 वकील.
- 7 मंत्री आहेत संघाशी जुळलेले.