आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi Inaugurated 3 Gold Schemes And Gold Coin With Ashokchakra

पंतप्रधानांचे ‘धनत्रयोदशी’ गिफ्ट, अशोकचक्र असलेले सुवर्ण नाणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी महत्त्वाकांक्षी सुवर्ण चलन, सुवर्ण नाणे, सुवर्ण रोखे अशा तीन योजनांचे उद््घाटन केले. या योजनेअंतर्गत पाच आणि १० ग्रॅम वजनाच्या देशाच्या पहिल्या सुवर्ण नाण्याचे अनावरणही त्यांच्या हस्ते झाले. या नाण्याच्या एका बाजूला अशोकचक्र आणि दुसऱ्या बाजूला महात्मा गांधींचे छायाचित्र असेल.

देशातील मंदिरे व घरांत असलेले ५२ लाख कोटींचे सुमारे २० हजार टन सोने बाजारात आणणे आणि सोन्याची आयात वाढल्यामुळे परकीय गंगाजळीवर पडणारा दबाव कमी करण्यासाठी आयात घटवणे हा या तिन्ही योजनांचा मुख्य उद्देश आहे. गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम अर्थात सुवर्ण मुद्रा योजनेत सोन्याचा वापर रोख चलनासारखा होईल. त्यासाठी बँक खाते उघडून घरात ठेवलेले अनुपयोगी सोने जमा करावे लागेल. त्यामुळे सोन्याची किंमत तर वाढेलच, पण त्यावर व्याजही मिळेल. ‘लहानपणापासून ‘सोने पे सुहागा’ ऐकत होतो; परंतु ‘सोने सुहागा’ काय असते हे या योजनेमुळे कळले. भारताकडे २० हजार टन सोने आहे. त्याचा वापर झाला पाहिजे. त्यामुळे देशाला गरीब देश संबोधण्याचे काहीच कारण नाही. भारतात सोने हा महिलांच्या सबलीकरणाचा स्रोत आहे. या योजनाही महिला सबलीकरण अधोरेखित करतील. भारतातील सोनारांनीही या योजनेत समाविष्ट केले पाहिजे,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी सांगितले.
पुढे वाचा, सरकारच्या तीन नव्या सुवर्णयोजनांबाबत...