आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिग्विजयसिंहाच्या चिरंजीवाच्या स्वागत सोहळ्याला पोहोचले मोदी आणि राहुल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेस महासचिव दिग्विजय सिंह यांचे चिरंजीव आमदार जयवर्धनसिंह यांच्या स्वागत समारंभासाठी काँग्रेस, भाजपसह प्रत्येक पक्षाचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान मोदी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हॉटेल अशोका येथे आयोजित स्वागत समारंभात नवदाम्पत्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.
काँग्रेस-भाजपसह अनेक पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती
दिल्लीच्या पंचतारांकित हॉटेल अशोका येथे आयोजित स्वागत समारंभात व्हीव्हीआयपी पाहुण्यांची मांदियाळी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्याशिवाय समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह, रामगोपाल यादव, सज्जन कुमार, सुबोधकांत सहाय, मल्लिकार्जुन खर्गे, सुशीलकुमार शिंदे, शरद यादव, करण थापर, अशोक गहलोत, प्रफुल्ल पटेल, ज्योतिरादित्य सिंधिया, प्रमोद तिवारी आणि लालू प्रसाद यादव उपस्थित होते.

राजकीय नेत्यांसह बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव, अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा यांच्यासह अनेकांनी जयवर्धन आणि सृजाम्याला शुभेच्छा दिल्या.
मंगळवारी झाले शुभमंगल
मध्यप्रदेशातील आमदार असलेले जयवर्धनसिंह यांचा मंगळवारी बिहारच्या डुमरीया राजघराण्यातील राजकुमारी सृजाम्यासोबत शुभमंगल झाले. हा शाही विवाह सोहळा दिल्लीतील कापसहेडा येथील कृष्णा फार्म हाऊस येथे झाला. विवाहाला मध्यप्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेशातील अनेक राजकीय नेते उपस्थित होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, वर-वधूला आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आलेले VVIP's
बातम्या आणखी आहेत...