आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाचा आर्थिक विकास शेजारी राष्ट्रांसाठी सुखकर ठरेल : मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो/नवी दिल्ली- भारताचा आर्थिक विकास झाल्यास त्याचा फायदा शेजारी राष्ट्रांना नक्कीच होईल. हा विकास सुखकर ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. रविवारी नूतनीकरण करण्यात आलेल्या जाफना क्रीडा संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी मोदी बोलत होेते. व्हिडिआे कॉन्फरन्सिगद्वारे मोदींनी त्याचे उदघाटन केले.

जाफना क्रीडा संकुलाच्या नूतनीकरणाचा खर्च भारताने केला आहे. उदघाटन समारंभाला श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. १९९७ पासून दुरैपा स्टेडियम बंद अवस्थेत होते. भारताने त्यावर कोटी रुपये खर्च करून त्याचे पुनरुज्जीवन केले आहे. मोदी पुढे म्हणाले, भारत श्रीलंकेसोबत वाटचाल करेल, जेणेकरून श्रीलंकेला आपल्या स्वत:च्या मार्गावरून चालता येईल. त्यातून श्रीलंकेच्या जनतेचे कल्याणही साधता येऊ शकेल. शेजारी देशांकडे आर्थिक समृद्धता यावी, असे भारताला वाटते. देशातील सर्व नागरिकांना एकता, शांती, बंधुभाव, सुरक्षा, समान संधी मिळावी. आपले संबंध केवळ दोन सरकारमधील नाहीत. त्याला इतिहास, भूगोलाचाही संदर्भ आहे. त्यामुळेच भारताच्या आर्थिक विकासात शेजारी देशांचाही फायदा होणार आहे. गेल्या वीस वर्षांपासून बंद अवस्थेतील स्टेडियमच्या नूतनीकरणाची प्रतीक्षा होती. स्टेडियमची आसन क्षमता हजार ८५० एवढी आहे. दरम्यान, जाफनातील नूतनीकरण केलेल्या स्टेडियमवर शनिवारी योग दिन आयोजित केले होते.