आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघे विश्व याेगसूत्रात, १९१ देशांच्या २ अब्ज लाेकांनी केली याेगासने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुमारे पाच हजार वर्षे जुनी योगविद्या रविवारी संपूर्ण जगाची झाली. अवघे विश्व याेगसूत्रात बांधले गेले. संयुक्त राष्ट्रांनी भारताचे आभार मानले. आता जागतिक आराेग्य संघटनाही मान्यता देईल. या एका आयोजनामुळे भारत विश्वगुरू झाला.

वर्ल्ड रेकॉर्ड राजपथावर 35,985 लोकांनी 35 मिनिटांत 21 आसने केली. 37 हजार चटया अंथरल्याचा दावा आयुष मंत्रालयाने केला.

गिनीज बुकने सरकारला दिली दोन वर्ल्ड रेकॉर्डची प्रमाणपत्रे
1. एकाच जागी 35,985 लोकांनी योगासने केली. 2. एकाच जागी 84 देशांतील लोक उपस्थित होते.
मागील रेकॉर्ड : ग्वाल्हेर (2005) 29,973 विद्यार्थ्यांनी केला होता योग.

१५२ देशांच्या मुत्सद्द्यांना आमंत्रण
- दिल्लीच्या विज्ञान भवनात योग संमेलन सुरू. सौदी, मलेशिया, कतार यासारख्या मुस्लिमबहुल देशांसह
३६ देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग.
- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यूएनमध्ये (न्यूयॉर्क) गेल्या. १४ केंद्रीय मंत्री राज्यांच्या आयाेजनांत सहभागी. उर्वरित मंत्री राजपथावरील कार्यक्रमात होते.
- २९ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांत झाला याेग. मात्र, यूपी, उत्तराखंड, बिहार, पंजाब, आेडिशा, तामिळनाडू, केरळात सरकारी कार्यक्रम नाहीत.
- ३९ इस्लामी देशांनीही योग केला. मात्र, पाकिस्तान, सौदी अरेबिया, मलेशिया, ब्रुनेई, लिबिया, बुर्किनाफासो, कॅमेरून व माॅरटानियाने नकार दिला.

योग जगण्याची जडीबुटी, कमोडिटी बनवू नका
योग ही आयुष्य पुरेपूर जगण्याची जडीबुटी आहे. ती विक्रीयोग्य वस्तू वा कुणाचा वारसा बनवल्यास योगाचेच सर्वाधिक नुकसान होईल. योग ही व्यवस्था नव्हे अवस्था, संस्था नव्हे आस्था आहे. आता जगाच्या अपेक्षा वाढतील व आपली जबाबदारीही. - पंतप्रधान नरेंद्र मोदी