आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • PM Modi Likely To Meet His Guru Swami Dayanand Giri In Rishikesh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऋषिकेश: गुरुला भेटण्यासाठी गेले PM, म्हणाले- काँग्रेस इतिहासजमा होईल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरु स्वामी द्यानंद गिरींसोबत पंतप्रधान मोदी - Divya Marathi
गुरु स्वामी द्यानंद गिरींसोबत पंतप्रधान मोदी
ऋषिकेश - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उत्तराखंडची देवभूमी ऋषिकेश येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्ला चढवत काँग्रेस इतिहासजमा होईल म्हटले आहे. मोदी म्हणाले, 'आता लोकांचे मनपरिवर्तन झाले आहे. आम्ही मुलींसाठी शाळांमध्ये टॉयलेटची व्यवस्था केली. गरीबांसाठी बँकांचे दरवाजे उघडले.' पंतप्रधान मोदींचे गुरु स्वामी दयानंद गिरी ऋषिकेशमध्ये राहातात, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते आले होते.

गुरुवारी भोपाळमध्ये विश्व हिंदी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाला जाण्यापूर्वी पंतप्रधानांनी कार्यकर्तांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता.काँग्रेसने पावसाळी अधिवेशन चालू दिले नाही असा आरोप त्यांनी केला. शुक्रवारी ऋषिकेशमध्येही त्यांनी पुन्हा काँग्रेसवर हल्ला केला. हे सकारात्मक राजकारण नसल्याचे ते म्हणाले. आगामी निवडणूकीत काँग्रेस नामशेष होईल असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, लोक म्हणतील एक काँग्रेस पक्ष होता.

गुरुची केली विचारपूस
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याआधी पंतप्रधानांनी त्यांचे गुरु स्वामी दयानंद गिरी यांची भेट घेतली. स्वामींच्या गंगा किनाऱ्यावरील आश्रमात जवळपास एक तास ते होते. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड पोलिस सतर्क होते.

कोण आहेत मोदींचे गुरु ?
स्वामी दयानंद गिरी हरिद्वारमधील ऋषिकेश येथील दयानंद सरस्वती आश्रम आणि कोईंम्बतूर मधील अर्श विद्या गुरुकुलम येथील गुरु आहेत. ते शंकर परंपरेतील वेद आणि संस्कृतचे विद्वान आहेत. जवळपास 50 वर्षांपासून ते जगभरात वेदांची शिकवण सांगत आहेत. नरेंद्र मोदी हिमालयात गेले होते तेव्हा त्यांना गुरु दयानंद गिरी भेटले होते. त्यानंतर ते त्यांच्यासोबत ऋषिकेशमधील शीशमझाडी आश्रमात राहिले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित फोटो...