आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमातेवर पानाची पिचकारी मारणाऱ्यांना \'वंदे मातरम्\' म्हणण्याचा अधिकार नाही: पंतप्रधान मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदींनी दिल्लीतील विज्ञान भवनातून देशातील विद्यार्थी आणि तरुणांना संबोधित केले. - Divya Marathi
मोदींनी दिल्लीतील विज्ञान भवनातून देशातील विद्यार्थी आणि तरुणांना संबोधित केले.
नवी दिल्ली- भूमातेवर पानाच्या पिंका थंुकून अस्वच्छता करणाऱ्यांना वंदे मातरम म्हणण्याचा कोणताही हक्क नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोतील धर्मसंसदेत दिलेल्या ऐतिहासिक भाषणाला १२५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सोमवारी मोदी बोलत हाेते. मोदींनी विज्ञान भवनात उपस्थित तरुणाईचे स्वच्छता, खानपान, विविधता आणि आधुनिकेतवर प्रबोधन केले. कार्यक्रमात वंदे मातरमचा घोष होताच मोदी म्हणाले, केवळ स्वच्छता करणाऱ्यांनाच वंदे मातरम म्हणण्याचा हक्क आहे. याच दिवशी पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जन्मशताब्दी विनोबा भावे यांची जयंतीही साजरी करण्यात अाली. 

काय खावे काय नाही, संस्कृतीचा भाग नव्हे 
एकादशीला काय खावे आणि पौर्णिमेला काय नाही, यावरच आपल्या चर्चा असतात. मात्र स्वामी विवेकानंदांनी काय खावे काय नाही, हे जगाला सांगितले होते. खाण्याबाबत दुराग्रह हा आपल्या संस्कृतीचा भाग नाही. 

तरुणाई भूतकाळात हरवलेली नाही 
जनशक्तीमुळे भारताची प्रतिमा बदलली आहे. आपण आपल्या गौरवगानानेच पुढे वाटचाल केली पाहिजे. जो भूतकाळात हरवलेला असतो, तो आजचा तरुण नाही. जो भविष्याचा विचार करतो, तोच खरा तरुण आहे. 

अाधी शौचालय, मग देवालय
आधी शौचालय मग देवालय, असे मी यापूर्वीही एकदा सांगितले होते. तेव्हा माझे केस ओढण्यात आले होते. मात्र, शौचालय नसेल तर लग्नच करणार नाही, असे म्हणणाऱ्या आज अनेक मुली आहेत. 

मी कॉलेजांतील ‘रोझ डे’चा विरोधक नाही 
बदलत्या काळासोबत वाटचाल करावी. काॅलेजांत ‘रोझ डे’ साजरा करण्यास माझा विरोध नाहीच. ही तर भावनांच्या अभिव्यक्तीची पद्धत आहे. ती कॉलेजांत नसेल तर मग कुठे असेल? आम्हाला यंत्रमानव व्हायचे नाही. आपल्या कॉलेजांत कधी पंजाब तर कधी केरळ दिनही साजरा करायला हवा. तेव्हाच आपल्या विविधतेतील एकता साकार होईल. देशातील तरुणांनी नाेकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनायला हवे. 

घाण करण्याचा अधिकार नाही 
भारतमाता सुजलाम सुफलाम आहे. स्वच्छता राखो वा राखो, कचरा करण्याचा आपल्याला हक्क नाही. वंदे मातरम बोलण्याचा देशात पहिला हक्क असेल तर तो सफाईचे काम करणाऱ्यांचा. लोक पान खाऊन भारतमातेवर पिंक टाकतात आणि वर वंदे मातरमही म्हणतात. 

भाषणातील महत्त्वाचे मुद्दे : 
- मोदी म्हणाले, 'युवकांचे मी अभिनंदन करतो. आज 11 सप्टेंबर आहे. 2001 पूर्वी जगाला 9/11 चे महत्त्व माहित नव्हते. दोष जगाचा नाही आपला आहे. कारण आपणच हा दिवस विसरलो होतो. आपण जर हा दिवस विसरलो नसतो तर कदाचित 21व्या शतकात 9/11 झाले नसते.'
- 'सव्वाशे वर्षांपूर्वीही एक 9/11 होता. त्या दिवशी एका तरुणाने, जो तुमच्याच वयाचा असेल. त्याच्या मनात एक उर्जा होती. हजारो वर्षांच्या गुलामीनंतरही त्याच्या मनात विचार निर्माण होत होते की जगाला माझा देश एक नवा मार्ग दाखवू शकतो.' 
- 'जगाला माहितच नव्हते की लेडिज अँड जेंटलमन याशिवायही काही शब्द असू शकतो. तेव्हा त्यांनी ब्रदर्स अँड सिस्टर्स हे शब्द उच्चारले आणि सर्वांच्या मन जिंकून घेतले होते.'
- वंदे मातरम् म्हण्याचा अधिकार जर कोणाला असेल तर तो, या देशातील सफाई कामगारांना आहे. जे भारत मातेचे खरे सेवक आहे. 
- पानची पिचकारी रस्त्यावर मारणाऱ्याला वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार नाही. अस्वच्छता करणाऱ्याला वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार नाही.
- या देशाचा सफाई कामगार आपले काम प्रामाणिकपणे करतो त्यामुळे आम्ही निरोगी आहोत. 
- 'आधी स्वच्छालय नंतर देवालय' हे आम्ही ठरविले आहे.
- स्वच्छता करणार आणि स्वच्छता राखणारे हे या भारत मातेचे खरे सुपूत्र आहे. 
- काय खावे आणि काय खाऊ नये ही आमची परंपरा राहिलेली नाही. 
- हा 'देश देने वाले का भी भला, ना देने वाले का भी भला' ही शिकवण असलेला देश आहे. 
- कृषिक्षेत्राला अत्याधुनिक करण्याचे विचार विवेकानंदांनी त्याकाळात मांडले होते. 
- जमशेदजी टाटा यांना त्यांनी पत्र लिहून येथे उद्योग उभे करा, असे आवाहन केले होते. 
- कॉलेजांमध्ये विविध डे साजरे होतात. या 'डे' ला विरोध नाही. मात्र त्यासोबतच जर पंजाब विद्यापीठात केरळ डे साजरा झाला तर. दुसऱ्या राज्यातील संस्कृतीचा उत्सव साजरा झाला पाहिजे. 
- विवेकानंदांचे नेहमी दोन रुप पाहायला मिळतात. ते जिथे गेले तिथे पूर्ण विश्वासाने भारताबद्दल अभिमानने बोलताना दिसतात. तर, जेव्हाते देशात असतात, तेव्हा आमच्या समाजातील वाईटावर कठोरपणे बोलत होते. अनिष्ट गोष्टींविरोधात आवाज उठवत होते. 
 
पुढील स्लाइडवर पाहा व्हिडिओ...
 
हेही वाचा... 
बातम्या आणखी आहेत...