आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंतप्रधान नरेंद्र मोदी संवादातील मास्टर : शशी थरूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्यानंतर टीकेचे धनी झालेले माजी मंत्री व काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी अजूनही आपल्या जिभेला आवर घातलेला नाही. रविवारी त्यांनी मोदी म्हणजे संवादातील मास्टर असल्याचे सांगत नवा मुद्दा चर्चेत आणला. मात्र, भाजप हिंदुत्वाच्या अजेंड्याला उघडपणे प्रोत्साहन देत असल्याचे ते म्हणाले.

माेदी यांचे संवादकौशल्य हीच एनडीए सरकारची खरी शक्ती असल्याचे थरूर म्हणाले. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांचे भाषण अत्यंत प्रभावी असते. त्यांनी केलेल्या घोषणाही जोरदार असतात. स्वत:चे फोटो कसे काढले जावेत आणि कसे छापून यावेत यातही ते माहिर आहेत. यावर कुणीही शंका घेणार नाही. यात अनेक लाभही आहेत. परंतु केवळ एवढेच पुरेसे नाही. मोदींनी आजवर जी आश्वासने दिली ती पूर्ण झालेली नाहीत. जनतेने माेदींना काम करण्यासाठी निवडून दिले आहे. मात्र, त्यांच्यातील उत्कृष्ट भाषणशैली असलेले व्यक्तिमत्त्वच आजवर समोर आले असल्याचे थरूर यांनी नमूद केले. या भाषणांचा परिणाम कधी दिसणार, हाच खरा प्रश्न असल्याचेही ते म्हणाले.

एकीकडे मोदी सर्वांना सोबत घेऊन कारभार करण्याची भाषा करतात. तर, दुसरीकडे त्यांचे मंत्री आक्षेपार्ह वक्तव्ये करीत राहतात.