आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi May Expand Cabinet On April 08; Mehbooba Mufti, Anil Desai

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार! सेनेचे देसाई, पीडीपीच्या महेबुबा इन तर, नजमा आऊट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार 8 एप्रिल रोजी मंत्रिमंडळ विस्तार करण्याची शक्यता आहे. आजपासून (शुक्रवार)भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक बंगळुरुत सुरु झाली आहे.
शिवसेनेच्या अनिल देसाईंना मिळू शकते कॅबिनेट मंत्रिपद
बैठकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात काही फेरबदल केले जाण्याची शक्यता वर्तवली जात असून जम्मू-काश्मीरमध्ये भाजपशी युती करून सत्तेत असलेल्या पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष व शिवसेना या दोन पक्षांना केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिले जाण्याची शक्यता आहे.
पीडीपी खासदार महेबुबा मुफ्ती, शिवेसेनेचे राज्यसभा खासदार अनिल देसाई यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकते. त्याशिवाय भाजपेच राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला जाऊ शकतो.
हेपतुल्ला, मिश्रांना डच्चू
अल्पसंख्याक विभागाच्या मंत्री नजमा हेपतुल्ला व लघुउद्योग मंत्री कलराज मिश्र यांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र देण्याची दाट शक्यता आहे. या दोघांना राज्यपालपदे दिली जाऊ शकतात. सध्या हिमाचल प्रदेश, मिझोरामसह काही राज्यांत पूर्णवेळ राज्यपाल नेमण्यात आलेले नाहीत.