आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सोनियांकडे गेले मोदी, पण गांधीनी अधिक बोलणे टाळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी - Divya Marathi
फाइल फोटो - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली - पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंगळवरी सभागृहात कामकाज झाले नाही, मात्र काही लक्षवेधी किस्से नक्कीच घडले. कामकाज सुरु होण्याआधी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या जागेवरुन उठून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे गेले. त्यांनी काँग्रेस अध्यक्षांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मात्र, सोनियांनी त्यांच्याशी बोलण्यात फार स्वारस्य दाखवले नाही. यावर राजकीय विश्लेषक अरविंद मोहन यांनी टीव्हीवरील चर्चेत म्हटले, की प्रकृतीची विचारपूस त्यांनी सभागृहात का केली. दोघेही दिल्लीतच राहातात, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
मोदींनी नाही दिले प्रश्नाचे उत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी उत्साहात सभागृहात जाण्यासाठी निघाले. यावेळी ते माध्यमांशी बोलण्यासाठी आले. पण जेव्हा पत्रकारांनी त्यांना भूसंपादनाविषयी छेडले तेव्हा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. वेगवेगळ्या चॅनल्स आणि वृत्तपत्रांच्या चार पत्रकारांनी मोदींना प्रश्न विचारले, पण त्यांनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि स्वतःचे निवेदन पूर्णकरुन पुढे निघाले.
मोदींनी पत्रकारांचे प्रश्न हसून टाळले

1 - भ्रष्टाचाराच्या आरोपावर तुमचे काय म्हणणे आहे ?

2 - सर, तुम्हाला विश्वास आहे सभागृह सुरळीत चालेल ?

3 - काँग्रेसने स्थगन प्रस्तावासाठी नोटीस दिली आहे, सरकार आज चर्चेला तयार आहे ?

4 - भूसंपादन विधेयकावर सरकारची पुढची रणनीती काय असेल ?
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची छायाचित्रे