आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींनी केला नमस्कार, पीएमनी हस्तांदोलनासाठी पुढे केला हात, अशी झाली भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गांधींनी पंतप्रधानांना नमस्कार केला तेव्हा त्यांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. - Divya Marathi
राहुल गांधींनी पंतप्रधानांना नमस्कार केला तेव्हा त्यांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला.
नवी दिल्ली - संसदेतील वाद-विवाद आणि संसदेबाहेरील कडवट वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी (75 वा वाढदिवस) सोहळ्यात गाठभेट झाली. यावेळी दोघांनी एकमेकांचे हात हातात घेत भेट घेतली. कार्यक्रम संपल्यानंतर पंतप्रधान जाण्यासाठी निघाले तेव्हा राहुल गांधींनी हात जोडून त्यांना नमस्कार केला, तर पंतप्रधानांनी सर्व वाद बाजूला ठेवत त्यांच्यासोबत हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. गेल्या वर्षी मेमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर दोन्ही नेते आमने-सामने येऊन नमस्कार-चमत्कार होण्याची वेळ तशी कमीच आली आहे.

या कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव, आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव, सीपीएम महासचिव सीताराम येचुरी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आणि माजी केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यासह तमाम पक्षांचे नेते पक्षभेद विसरुन उपस्थित होते.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींचे काही फोटोज्.. आणि कोण काय म्हणाले
बातम्या आणखी आहेत...