आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलितांची व्होट बँक तयार करण्याचे मोदी यांचे आदेश, चार राज्यांतील निवडणुकांवर भर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजप सत्तेवर असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दलितांची पक्षासाठी व्होट बँक तयार करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. त्या दृष्टीने त्यांनी व्यूहरचना तयार करावी, अशा सूचना दिल्या आहेत.  
 
सोमवारी भाजपच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत दलित राष्ट्रपतींची निवड करून पक्षाने दलितांचा पाठिंबा मिळवण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी दलितांवर लक्ष केंद्रित करावे. भारतीय जनता पक्ष त्यांचा विकास करू शकतो, असा विश्वास त्यांच्यात निर्माण करावा, असे पंतप्रधान मोदी यांनी बजावले आहे.  
 
भाजपची सत्ता असलेल्या गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानातील निवडणुकांच्या दृष्टीने विकासाच्या अजेंड्याचा प्रचार करण्याचा सल्ला दिला. या राज्यांत लवकरच निवडणुका होत आहेत. नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांकडे “एक भारत-श्रेष्ठ भारत’ अशी ५ वर्षांचा कार्यक्रम दिला असून ही योजना मोहिमेप्रमाणे राबवावी, अशी सूचना केली. या बैठकीत भाजप सत्तेवर असलेल्या १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त बिहार, जम्मू-काश्मीर अाणि गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती होती. मंगळवारी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा  हेसुद्धा मुख्यमंत्र्यांशी स्वतंत्र चर्चा करणार आहेत. मंगळवारच्या बैठकीत अमित शहा काय टिप्स देतात याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.
 
गोरखपूर, मंदसौर आणि बराला प्रकरणावर  विरोधी पक्षांना सडेतोड उत्तर न दिल्याने मोदी नाराज : गोरखपूरमध्ये झालेले बालमृत्यू, चंदिगडचे विकास बराला प्रकरण आणि मध्य प्रदेशातील मंदसौर येथे शेतकऱ्यांवर  झालेला गोळीबार यामुळे भाजपच्या विरोधात वातावरण तयार झाले, यावरही मोदी यांनी नाराजी व्यक्त केली. नुकत्याच झालेल्या काही घटनांवर विरोधकांना सडेतोड उत्तर द्यायला हवे होते, असा आग्रह त्यांनी धरला.  

सोशल मीडियावर भर न दिल्याने  पंतप्रधान मोदी यांनी झापले
मोदी यांनी मुख्यमंत्री सोशल मीडियावर कार्यरत राहत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केेली. यावर कोणाचे नाव घेतले नाही. या बैठकीत उपस्थित असलेले पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांना काही ताकीद दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी इतके व्यग्र राहूनही साेशल मीडियावर सर्वाधिक अॅक्टिव्ह असतात, असे शहा यांनी निदर्शनास आणून दिले.
 
बातम्या आणखी आहेत...