आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक गायक गुलाम अलींची मोदींनी घेतली भेट, वाराणसीतील अनुपस्थितीबद्ल दिलगिरी व्यक्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी प्रसिद्ध पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांची भेट घेतली. मोदींनी या भेटीचा फोटो ट्विट करताना लिहिले आहे, की गुलाम अली साहेबांना भेटून आनंद झाला. आमच्यात बराच वेळ चर्चा झाली. त्यांनी सांगितले, की वयाच्या नवव्या वर्षापासून ते गात आहे. त्यांच्या गायन साधनेला आता सहा दशकाहून अधिक कालावधी झाला आहे. गुलाम अली आणि मोदी यांनी नियोजित भेट याआधीच ठरली होती, मात्र काही कारणास्तव ती भेट टळली होती. याबद्दल मोदींनी खेद व्यक्त केला.
कार्यक्रमाला येऊ न शकल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली
नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथील संकट मोचन मंदिरात 8-12 एप्रिल दरम्यान संगीत समारोह आयोजित करण्यात आला होता. त्यात गुलाम अली यांनी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत गायन केले होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहु शकले नव्हते. याबद्दल त्यांनी ट्विटरवर दिलगिरी व्यक्त केली होती. त्यांनी लिहिले होते, 'संकट मोचन मंदिरात आयोजित संगित समारोह संगीत प्रेमींसाठी एक सुंदर भेट आहे. यात अनेक दिग्गज गायक सादरीकरण करणार असल्याचे मी वृत्तपत्रात वाचले आहे. गुलाम अली साहेब देखील येथे गाणार आहेत. पण या सोहळ्याला मला उपस्थित राहाता येत नाही. आयोजकांना मी शुभेच्छा देतो आणि आशा करतो की भविष्यात अशी संधी परत मिळाली तर मी नक्कीच त्याचा आस्वाद घेईल.'