आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 दिवसांच्या गुगल ट्रेंडमध्ये मोदींची प्रसिद्धी सर्वाधिक, उ.प्र निवडणुकीत अखिलेशहून 6 पट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उ.प्र. निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदी प्रसिद्धीत सर्वात पुढे आहेत. ३० दिवसांच्या गुगल ट्रेंडमध्ये मोदींनी अखिलेश यादव, राहुल गांधी आणि मायावतींना मागे टाकले आहे. पीक पॉप्युलॅरिटी इंडेक्सकडे पाहिल्यास मोदींना सोडून उर्वरित तिघे नेते यादरम्यान एकदाही १०० लोकप्रियतेचे गुणालाही स्पर्श करू शकलेले नाहीत. मोदींची सरासरी लोकप्रियता अखिलेशपेक्षा ६ पट, राहुलपेक्षा ८ पट आणि मायावतींपेक्षा १० पट अधिक आहे. 

गेल्या महिनाभरात हे नेते आपली विधाने आणि आरोपांसंबंधी सर्वाधिक सर्च केले गेले. गेल्या तीस दिवसांत मोदींची लोकप्रियता सर्वाधिक ८ फेब्रुवारी रोजी १०० लोकप्रियतेच्या गुणांवर राहिली. ८ फेब्रुवारी रोजी मोदींनी लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेसवर निशाणा साधला होता. राज्यसभेत त्यांनी रेनकोटवाले विधान केले होते. मोदींच्या या टिप्पणीनंतर राज्यसभेत जोरदार गोंधळ झाला होता. या कारणाने ८ फेब्रुवारी रोजी मोदी सर्वाधिक सर्च केले गेले होते.  

उ.प्र.मध्येही मोदी सर्वात पुढे 
उ. प्र.मध्ये मोदींच्या लोकप्रियतेच्या गुणांकनात अखिलेश, राहुल आणि मायावतींपेक्षा पुढेच आहेत. येथे मोदींच्या लोकप्रियतेचे गुण आहे ६९. अखिलेश यांचे गुण आहेत ३१, मायावतींचे १० गुण आणि राहुल गांधी यांचे सर्वात कमी फक्त ८ गुण आहेत.  
 
मोदींची सरासरी लोकप्रियता ६५   
मोदींची ३० दिवसांतील सरासरी लोकप्रियता गुण ६५ आहेत. ११ गुणांसह अखिलेश दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर राहुल यांना ७ आणि मायावतींना ५ गुण मिळाले. अलीकडील दिवसांत अखिलेश, राहुल आणि मायावतींची लोकप्रियता ५० देखील नाहीये.     

अखिलेश यादवसंबंधी या की-वर्ड सर्च केल्या गेल्या 
१. बेबी को बेस पसंद आहे. यूपीला अखिलेश पसंद है, २. यूपी को अखिलेश पसंद हैं, ३. राहुल गांधी, ४. अखिलेश यादव अँड राहुल गांधी, ५. अखिलेश यादव सांग, ६. डिंपल यादव. 
बातम्या आणखी आहेत...