आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपूर्ण सामरिक भागीदारीसाठी पंतप्रधान मोदींचा सिंगापूर दौरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ब्रिटनच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ नाेव्हेंबरपासून सिंगापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारत-सिंगापूर यांच्यात संपूर्ण सामरिक भागीदारीसाठी मोदी यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोदी यांचा हा दोनदिवसीय दौरा असेल. द्विपक्षीयदृष्ट्या ही भेट महत्त्वाची आहे. संरक्षण सहकार्य, सायबर सुरक्षा, संस्कृती आणि नागरी व्यवस्थापनासारख्या क्षेत्रात उभय देशांत सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात मोदी विविध सामंजस्य करारावर स्वाक्षरी करतील. भारत आणि सिंगापूर यांच्यात सुमारे १७ अब्ज डॉलर्सचा व्यापार आहे. १९९० च्या सुरुवातीपासून सिंगापूरमधील अनेक कंपन्या भारतात सक्रिय आहेत. इक्विटी बाजारातही सिंगापूरच्या कंपन्यांचा मोठा वाटा आहे. दरम्यान, आर्थिक, हवाई, नौदलाचे हब अशा सर्व दृष्टीने सिंगापूर भारतासाठी महत्त्वाचे आहे. त्याशिवाय शहरी विकास आणि कौशल्य विकासात सिंगापूरचा हातखंडा भारताला भविष्यातील नियाेजनासाठी मोलाचा ठरणार आहे. त्यामुळेच ही भागीदारी सामरिक आणि द्विपक्षीय अशा दोन्ही पातळीवर नव्या पर्वाला सुरुवात करणारी ठरेल, अशी अपेक्षा सरकारला वाटते.

शनिवारी एशियान परिषदेत सहभाग
सिंगापूरला जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ नोव्हेंबर रोजी मलेशियाच्या राजधानीत होणाऱ्या १३ व्या एशियान-इंडिया परिषदेत सहभागी होतील. शनिवारपासून क्वालालंपूरमध्ये होऊ घातलेल्या परिषदेत प्रदेशातील वाढत्या दहशतवादाच्या संकटावर चर्चा होईल. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रातील सहकार्यावरदेखील भर असेल. सिंगापूरच्या सुमारे ५० लाख लोकसंख्येपैकी भारतीयांची संख्या ३ लाख ५० हजारांवर आहे. त्यामुळे देशात भारतीय समुदायाचा दबदबा दिसून येतो. अमेरिकेसह युराेपमध्ये भारतीय मोठ्या संख्येने दिसून येतात. सिंगापूरमध्येही भारतीय व्यापार, नोकरीच्या निमित्ताने वसलेले आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कसा राहील मोदी यांचा दौरा... कोणत्या मुद्यांवर राहील भर...