आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार निवडणूक : लालू रिमोटने बिहार चालवू इच्छितात - नरेंद्र मोदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - लालूप्रसाद यादव यांना रिमोट कंट्रोलने बिहारचे सरकार चालवण्याची इच्छा आहे, अशी टीका करतानाच ते निवडणूक का लढवत नाहीत हे जरा त्यांना विचारा, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सासारामध्ये लगावला.

लालूंनी नेमके काय पाप केले आहे हे त्यांना विचारले पाहिजे. ते निवडणूक का लढवत नाहीत हे बिहारच्या मीडियाने त्यांना विचारावे. त्यांचा निवडणूक लढवण्याचा हक्क कोणी काढून घेतला हे त्यांना विचारले पाहिजे. वास्तविक त्यांना सरकार रिमोटने चालवण्याची इच्छा आहे. दुसरीकडे एका नेत्याने काँग्रेसला ४० वर आणले आहे, अशा शब्दांत मोदी यांनी राहुल यांच्यावरही टीकास्त्र सोडले. महाआघाडी ही खुर्चीसाठी स्वार्थाची आघाडी आहे. या तीन व्यक्ती आहेत. तिघेही कधी ना कधी परस्परांशी लढले आहेत. आता मात्र मतलबासाठी एकत्र आले आहेत. त्यांचा स्वार्थ समान आहे. खुर्ची हाच त्यांचा स्वार्थ आहे. त्यांना ६० वर्षांत काय केले हे विचारा.

बटण दाबा आणि शिक्षा द्या : ही निवडणूक केवळ सरकार स्थापन करण्यासाठी नाही. जुन्या सरकारांना शिक्षा देण्यासाठी ही निवडणूक आहे. त्या सरकारांनी बिहारला बरबाद केले आहे. येथील मतदारांनी त्यांना शिक्षा देण्याचा संकल्प केला आहे. बटण दाबून गुन्हेगारांना शिक्षा देण्याचा निर्णय घ्यायचा की नाही हे ठरवा. १६ तारखेला फैसला करा.