आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 व्या \'मन की बात\'मध्ये मोदी म्हणाले, जवानांचे हे बलिदान अतुलनीय, यंदाची दिवाळी समर्पित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नरेंद्र मोदींनी दिवाळीच्या दिवशी 25 व्या वेळी देशातील नागरिकांबरोबर ‘मन की बात’केली. त्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, काही महिन्यांपासून सीमेपलिकडून ज्या घटना घडत आहेत, त्याला जवान सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत. जवानांचे हे बलिदान अतुलनीय आहे. त्यामुळे ही दिवाळी सुरक्षा रक्षक आणि संरक्षक दलांसाठी समर्पित करावी. देशात असा एकही व्यक्ती नसेल ज्याला जवानांवर अभिमान नसेल, असे मी अगदी आदराने सांगू इच्छितो असेही मोदी म्हणाले.
आणखी काय म्हणाले मोदी..
- सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा.
- पौर्णिमा आणि अमावस्येला सुटी असायची. त्याला वैज्ञानिक आधारही असायचा. आता रविवारी सुटी असते.
- आज समाजात जो अंधकार पसरला आहे, तो दिवा लावून दूर करा.
- दिवाळीला प्रत्येक कुटुंबात स्वच्छतेची खास काळजी घेतली जाते.
- पण केवळ घरच नव्हे तर संपूर्ण परिसर, कॉलनी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा.
- जगातील अनेक देशांमध्ये दिवाळीची धूम आहे.
- यूएन पोस्टल सर्व्हिसने दिवाळीचा स्टॅम्प काढला आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांनी दिवा लावतानाचा फोटो शेअर केला आहे. सिंगापूरच्या पंतप्रधानानीही तसाच फोटो शेअर केला आहे.
- सिंगापूरच्या प्रत्येक गल्लीत दिवाळीचा उत्साह आहे. दिवाळीच्या निमित्ताने त्याठिकाणच्या 16 महिला खासदारांचे फोटो व्हायरल होत आहेत.

फटाके जरा जपून...
- मोदी म्हणाले, दिवाळीला फटाके फोडताना अनेकदा अपघातही घडतात. त्यामुळे जरा जपूनच दिवाळी साजरी करा. कारण डॉक्टरदेखिल सुटीवर असतात. त्यामुळे सावध राहा.
- दिवाळीचा उत्सव मोठा असतो. कार्तिक पोर्णिमेपर्यंत चालतो. देशातील पूर्वेकडील राज्यांत छट पुजा असते. सामान्यपणे उगवत्या सूर्याची पुजा केली जाते. पण हा उत्सव मावळत्या सूर्याच्या पुजेचा असतो. सर्वासाठी शुभेच्छा.

दिवाळी जवानांना अर्पण
- नेते, क्रीडापटू, दुकानदार, व्यावसायिक सर्वांनीच नक्की जवानांसाठी दिवा नक्की पेटवला असणार. सर्वांच्याच मनात जवानांसाठी आदर आहे.
- ही दिवाळी जवानांच्या नावे अर्पण आहे. अवघा देश जवानांबरोबर उभा आहे.
- आसाम राफल्स, कोस्टगार्ड्स, सीआरपीएफ, बीएसएफ इतके दल आहेत की मी नावेही घेऊ शकणार नाही. आपल्या उत्सवकाळात ते आपल्याबरोबर सुरक्षेसाठी तैनात आहेत.
- लोकांनी नरेंद्र मोदी अॅप, mygov वर मॅसेज पाठवले. काहींनी पेंटींग केले काहींनी कविता लिहिल्या, जवानांसाठी कार्टून तयार केले. हे सर्व अभिमानास्पद आहे.
- मोदींनी अश्विनी चौहानच्या कवितेचा उल्लेख केला, "मैं चैन से सोता हूं कि तुम सीमा पर तैनात हो। शत-शत नमन तुम्हें।"
बातम्या आणखी आहेत...