आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 देश आणि 33 हजार KM प्रवास 140 तासांमध्ये, अशी आहे मोदींची फॉरेन ट्रिप मॅनेजमेंट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नरेंद्र मोदी सध्या पाच दिवसाच्या विदेश दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यानचे त्यांचे टाइम मॅनेजमेंट चर्चेत आले आहे. सहा दिवसांचा दौरा ते जवळपास 140 तासांत पूर्ण करणार आहेत. यात ते साधारण 45 तास फ्लाइटमध्ये राहातील आणि 33 हजार किलोमीटर प्रवास करतील. मोदींनी आतापर्यंत अफगाणिस्तान, कतार आणि स्वित्झर्लंडचा दौरा संपवला आहे. मंगळवारी सकाळी ते वॉशिंग्टन डीसी येथे पोहोचले. अमेरिकत ते 48 तास राहातील. त्यानंतर ते मॅक्सिकोला जाणार आहेत. मोदींनी गेल्या दोन वर्षांमध्ये 40 देशांचा दौरा केला आहे.

असे आहे PM मोदींचे टाइम मॅनेजमेंट
- मोदींनी मागील दौऱ्यांप्रमाणेच या दौऱ्यातही ट्रॅव्हलींग दरम्यान हॉटेलमध्ये मुक्काम करण्याऐवजी फ्लाइटमध्ये रात्रीचा आराम करण्याचा निर्णय घेतला.
- मोदींनी 4 जून रोजी अफगाणिस्तानपासून दौऱ्याला सुरुवात केली.
- 5 दिवसांच्या दौऱ्यात मोदींनी 45 बैठका निश्चित केल्या आहेत. पंतप्रधान कार्यालयातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार पंतप्रधानांचा हा सर्वाधिक व्यस्त दौरा आहे. दररोज ते एका पाठोपाठ एक अशा 8-9 मिटिंग घेत आहेत.

शिष्टमंडळ खाली उतरले नाही
पंतप्रधान वेळेबाबत एवढे कमिटेड आहेत की अफगाणिस्तान आणि स्वित्झर्लंड दौऱ्या दरम्याने भारती शिष्टमंडळ त्यांच्या विशेष विमानातून खाली देखील उतरले नाही. असेच मॅक्सिकोमध्येही झाले. वेळ वाचवण्यासाठी असे करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

पहाटे भारतात परतणार पंतप्रधान
- पाच देशांच्या दौऱ्यात मॅक्सिको ट्रिप सर्वात छोटी राहाणार आहे. येथे ते फक्त चार तास थांबणार आहेत. येथे मोदी मॅक्सिकन राष्ट्रध्यक्षांची भेट घेणार आहेत, त्याशिवाय एका खासगी कार्यक्रमात ते सहभागी होतील.
- मोदी 9 जून रोजीच मॅक्सिकोमधून भारतात परत येतील. त्यांचा हा प्रवास साधारण 21 तासांचा असेल. या दरम्यान फ्रँकफर्ट येथे ते टेक्निकल हॉल्टसाठी दीड तास थांबतील. 10 जून रोजी सकाळी 5 वाजता ते दिल्लीत पोहोचतील. त्याच दिवशी ते पुन्हा कामकाजाला सुरुवात करतील.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...