आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Modi, Sheikh Hasina Hold Bilateral Talks; Focus On Defence Arrangements River Teesta

VIDEO: वाहतुकीचा खाेळंबा न करता कारने विमानतळावर पाेहोचले नरेंद्र मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली  - बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना शुक्रवारी सात वर्षांच्या खंडानंतर भारतात दाखल झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोटोकॉल मोडून विमानतळावर त्यांचे स्वागत केले. मोदींनी सुरक्षा संकेतांना बगल देत ताफा बाजूला ठेवला आणि फक्त एका कारने विमानतळ गाठले.

मोदींचे निवासस्थान असलेल्या ७-लोककल्याण मार्गापासून विमानतळापर्यंतचा रस्ता सुरळीत वाहत होता. पंतप्रधानांचा ताफा जाणार म्हणून वाहतुकीला अडथळा किंवा रोखण्यात आले नव्हते. मोदींसोबत केवळ चालक व एसपीजी अधिकारी होते. पंतप्रधानांच्या ताफ्यातील एकुलती एक कार वाहतुकीचा लाल दिवा लागल्याबरोबर थांब्यावरही काही क्षण विश्रांती घेत होती. अर्थात सामान्य वाहनचालकांसाठी असलेल्या नियमांचे पालन करत त्यांची कार विमानतळावर पोहोचली. वास्तविक पंतप्रधानांच्या ताफ्यात १० हून अधिक गाड्या व सुमारे ८० हून अधिक लोकांचा चमू असतो. विमानतळावर पोहोचताच हसीना यांच्यासोबत अालेले अधिकारीही पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत सेल्फी घेताना दिसून आले. अबुधाबीचे युवराज शेख मोहंमद बिन जायद अल नाहयान यांच्या स्वागतासाठीही मोदींनी वाहतुकीला कोणताही अडथळा न आणता विमानतळ गाठले होते.   
 
बांगलादेशला ३२ हजार कोटी रुपयांची मदत
भारत व बांगलादेश यांच्यात शनिवारी २२ करार झाले. त्या अंतर्गत भारत बांगलादेशला सुमारे ३२ हजार १४० कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व पंतप्रधान शेख हसीना यांच्यातील चर्चेदरम्यान अणुऊर्जेच्या शांततामय वापरासाठी उभय देशांत सहमती झाली आहे. हैदराबाद हाऊसमधील चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. दोन्ही नेत्यांनी दहशतवादाच्या विरोधात मिळून लढण्याचा संकल्प केला.
 
पुढील स्लाईडवर वाचा, काय म्हणाले मोदी...? आणि काय म्हणाल्या हसीना...?
पुढे पाहा फोटो आणि व्हिडिओ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...