आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग एकाच मंचावर एकत्र दिसले. दुसरीकडे बिहारमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी विरोधकांचे मुखवडे असलेला रावणदहन केल्याची माहिती समोर आली आहे.
बिहारमध्ये भाजपचे कार्यकर्त्यांनी जेडीयू प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री नीतीश कुमार, आरजेडी प्रमुख लालू यादव, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह विरोधक नेत्यांचे मुखवटे लावलेल्या प्रतिकात्मक रावणाचे दहन केले. तर राजधानीतील सुभाष मैदानावर आयोजित दसरा कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत रावणदहन करण्यात आले. एरव्ही एकमेकांवर टीका करणारे राजकीय विरोधक असलेले नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी
आपापासात चर्चा करताना दिसले. यावेळी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंह हे देखील उपस्थित होते.
मोदी आणि सोनिया दिसल्या चर्चा करताना
सुभाष मैदानावर आयोजित रावणदहन कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हामिद अन्सारी,
पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदी, सोनिया गांधी आणि मनमोहन हे तिन्ही नेते आपापसात चर्चा करताना दिसले.
मोदी यांनी श्रीप्रभु राम यांच्यासह हनुमानाही लावला टिळा...
रावणदहनापूर्वी श्रीप्रभु राम यांची आरती झाली. राष्ट्रपती, उपराष्ट्रपी, मोदी, मनमोहन सिंग आणि सोनिया, यासगळ्यांनी रामाला टीळा लावला तर मोदी यांनी श्रीरामसह लक्ष्मण आणि हनुमानाही टिळा लावून त्यांना अभिवादन केले.
बिहारमध्ये सोनिया-राहुल यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन...
पाटणामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांचे मुखवटे असलेला प्रतिकात्मक रावणदहन केला. रावणाचा दहा मुंडक्यांमध्ये नीतीश कुमार यांचाही मुखवटा होता. याशिवाय लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी, मायावती, मुलायमसिंह यादव यांचेही मुखवटे होते.