आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरा-राजीव गांधींसह मोदींनी केला स्टॅलिनचा उल्लेख,10 मुद्द्यात समजून घ्या भाषण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेद्र मोदींनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधींचा नामोल्लेख टाळून, काही लोकांचे फक्त वय वाढते समज वाढत नाही, अशी खरमरीत टीका मोदींनी केली. संसदेचे कामकाज चालू न देण्याच्या सदस्यांच्या पद्धतीवर राजीव गांधींचा दाखला देऊन शरसंधान साधले.
1 - काही मनोरंजन करतात...
मोदी म्हणाले, 'विरोधीपक्षातही चांगले बोलणारे आहेत, मात्र वर्चस्वाच्या न्यूनगंडामुळे इतरांना बोलू दिले जात नाही. काही लोक वाचून येतात आणि मनोरंजनही करतात. वास्तविक आपण कोणाची खिल्ली उडवू नये.' राहुल गांधींनी बुधवारी लोकसभेत मोदींवर टिका केली होती. त्याला राहुल यांचे नाव न घेता मोदींनी प्रत्युत्तर दिले.
सभागृहाच्या कामकाजात वारंवार अडथळे आणण्याच्या वृत्तीवर बोलताना पंतप्रधान म्हणाले, 'संसदेत मते मांडली जातात, टोकाची प्रत्युततरे दिली जातात, जिथे सरकारवर टीका केली जाते, सरकारला टीकेला प्रत्युत्तर द्यावे लागते, याठिकाणी कोणाचाही मुलाहिजा बाळगला जात नाही. मात्र, संसदेच्या प्रतिमेला तडा जाऊ नये याची खबरदारी घ्यायला हवी, हे मी नाही म्हणत तर राजीव गांधींचे विधान आहे.'
पुढील स्लाइडमध्ये,
>> काही लोकांना वेळ निघून गेल्यावरही कळत नाही
>> इंदिरा गांधींचा दाखला देऊन राहुल यांच्यावर निशाणा
>> स्टॅलिनचा किस्सा सांगत केले अभिव्यक्तीवर भाष्य
>> उपदेश देणे सोपे..
>> 'आम्हाला तुम्हीच संधी दिली'