आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi Talks With Bureaucrats For Tension Free Work

तणावग्रस्त जीवनातून काय मिळणार, खुश राहण्यावर बंदी अाहे काय : नरेंद्र माेदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील अधिका-यांशी मॅनेजमेंट गुरूच्या रूपात संवाद साधला. "तणावग्रस्त व्यक्ती काहीच साध्य करू शकत नाही. तुम्हाला इतका मोठा देश चालवायचा आहे. त्यामुळे तुम्ही तणावात राहून चालणार नाही. तुम्ही कोमेजून गेले तर देश कसा उमलणार?' अशा शब्दांत मोदी यांनी सनदी अधिका-यांना सल्ला दिला.

नागरी सेवा दिनाच्या पार्श्वभूमीवर विज्ञान भवनात आयोजित समारोहात ते बोलत होते. कार्यक्रमास उपस्थित नोकरशहांना त्यांनी सुमारे १ तास १० मिनिटांपर्यंत मार्गदर्शन केले. मोदी म्हणाले, "तुम्ही खूप शिकलात म्हणूनच इथपर्यंत पोहोचला आहात. येथे कोणी जिंदाबाद-मुर्दाबादवाले पोहोचू शकत नाही. वेळेचे व्यवस्थापन तुम्हाला चांगले जमते. परंतु कुटुंबीयांसोबत तुम्ही क्वालिटी टाइम घालवता काय? हे गरजेचे आहे. मात्र, याबाबत मी तुम्हाला काहीच मार्गदर्शन करू शकत नाही. कारण याबाबत मी बेकार आहे.' आपापल्या क्षेत्रात चांगली कामगिरी बजावणा-या अधिका-यांना पंतप्रधानांनी या वेळी सन्मानित केले. सोबतच "बेस्ट प्रॅक्टिसेस टुमॉरो इज हिअर' या पुस्तकाचेही प्रकाशन केले.

राजकीय हस्तक्षेप आवश्यक
देश चालवण्यात राजकीय हस्तक्षेप नसावा, यामुळे सिस्टिम बिघडते. मात्र, पॉलिटिकल इंटरव्हेन्शन आवश्यक आहे. कारण लोकप्रतिनिधींना जनता निवडून देत असते.

आयुष्य रोबोटसारखे नसावे
आयुष्यात फायलीतच गुरफटून जाऊ नये. रोबोट बनू नका. कारण याचा सरकारवर परिणाम होईल. तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथे आनंदावर बंदी आहे काय? त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता काम करावे.आयुष्याबाबत विचार केला? कधी आपला विचार केलाय काय? आयुष्य फाइल बनून तर राहिले नाही ना? असे जगणे नसते. लाइफ सांभाळू शकला नाहीत तर फाइलही सांभाळता येणार नाही.

शीलं परम भूषणम्
मसुरीच्या आयएएस अकादमीत "शीलं परम भूषणम्' हे वाक्य लिहिले आहे.अर्थात चरित्र हाच तुमचा सर्वोच्च गुण आहे. जुने अधिकारी हे विसरले असतील. मात्र नव्यांनी ते लक्षात ठेवावे.

माजी आयएएस अधिका-याचे नोकरशाहीला दूषण
लखनऊ । उत्तर प्रदेशच्या माजी आयएएस अधिकारी प्रोमिला शंकर यांनी त्यांच्या "गॉड्स ऑफ करप्शन' या पुस्तकातून नोकरशाहीला वाईट आणि भ्रष्ट म्हटले आहे. त्या म्हणाल्या, अधिकारी स्वत:ला एखाद्या राजाप्रमाणे समजतात. कामाच्या बदल्यात किती घेणार, असे लोक विचारतात. कंत्राटादारांना टक्केवारी दिली जाते. काही जागी नोटा मोजण्याचे यंत्रही बसवण्यात आले आहे.