नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील एनडीए सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन 7 जुलैपासून सुरु होणार आहे. 14 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. अधिवेशनामध्ये रेल्वे अर्थसंकल्प 8 जुलै रोजी तर केंद्रीय अर्थसंकल्प हा 10 जुलैरोजी सभागृहात सादर करण्यात येणार आहे. रेल्वे अर्थसंकल्पात वैष्णोदेवीच्या भाविकांना मोदी सरकारतर्फे गुडन्यूज मिळण्याची शक्यता आहे. उधमपूर- कटरा रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
रेल सुरक्षा आयुक्त (सीआरएस) यांची या मार्गाला मंजुरी मिळाली आहे. रेल्वे बजेट 2014-15 मध्ये या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. उधमपूर-कटरा हा 25 किलोमीटरच्या मार्गाचे उद्घाटन लवकरच होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाच्या सुत्रांनी दिली. वैष्णो देवीचे दर्शनासाठी पर्यटकांना कटारापर्यंत महामार्गाने पोहोचावे लागते. उधमपूर-कटरा हा रेल्वे मार्ग खुला झाल्यानंतर पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
उधमपूर- कटला या मार्गाच्या निर्मितीसाठी 1,050 कोटी रुपये खर्च करण्यात आला. रेल्वे मंत्रालयातील एक वरिष्ठ अधिकार्याने सांगितले, की रेल्वे सुरक्षा आयुक्ताने या मार्गाच्या सुरक्षेबाबत काही महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले आहेत. सुरक्षेबाबतील कटरा रेल्वे मार्ग खुला करण्याची तारीखेबाबत माहिती मिळाली नसली तरी रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी या मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
(फोटो कॅप्शन - लोकसभा, फाईल फोटो)