आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pm Modi To Launch Make In India Campaign, Divya Marathi

MAKE IN INDIA लाँचमध्ये मोदी म्हणाले, एफडीआय म्हणजे फर्स्ट डेव्हलप इंडिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - मेक इन इंडियाचा लोगो
नवी दिल्‍ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौ-यावर रवाना होण्यापूर्वी महत्त्वाकांक्षी 'मेक इन इंडिया' कँपेन लाँच केले. कँपेनचा लोगो लाँच केल्यानंतर मोदींनी उद्योगपतींना संबोधित केले. सरकारच्या निर्णयांनी एक विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. विकासात सरकार आणि जनता दोन्हींचे सहकार्य गरजेचे असते असे सांगत त्यांनी एफडीआयची एक नवी व्याख्या सर्वांसमोर मांडली. भारतीयांसाठी एफडीआई म्हणजे 'फर्स्‍ट डेवल्‍प्‍ड इंडिया' असा अर्थ असल्याचे ते म्हणाले.
वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला
मोदी म्हणाले, 'उद्योगपती भारतात गुंतवणूक करायला उत्सुक नसल्याचे पाहून मला दुःख व्हायचे. गेल्या काही वर्षात जेव्हा मी उद्योगपतींना भेटायचो तेव्हा ते व्यवसाय परदेशात स्थलांतरीत करण्याचा विचार करत असायचे. ते वातावरण बदलण्याचा प्रयत्न आम्ही केला असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.

माफी मागताच वाजल्या टाळ्या
मोदींनी भाषणाची सुरुवात हलकी फुलकी केली. ते म्हणाले, 'आज अनेक लोकांना जागा मिळाली नसल्याचे मी पाहिले. त्यासाठी मी माफी मागतो. या हॉलला एवढ्या लोकांची सवय नाही.' मोदींच्या या वाक्यावर जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला.

जगभरात कार्यक्रम
जगभरातील देशांच्या राजधानींमध्ये मेक इन इंडियाच्या प्रमोशनसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे मोदींनी सांगितले. तसेच, भारतीय दुतावासांमध्येही कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. पंतप्रधानांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात 'मेक इन इंडिया' ची घोषणा दिली होती. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे गुरुवारी मोदींनी देश-विदेशातील प्रसिद्ध उद्योगपतींच्या उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ केला. याद्वारे जगातील प्रमुख 3000 कंपन्यांना भारतात गुंतवणुकीसाठी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

उद्योगपतींचे कौतुक
यावेळी उपस्थित असलेले रिलायन्स इंडस्‍ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी पुढच्या 12 ते 15 महीन्यांच सुमारे सव्वा लाख नोक-या निर्माण करणार असल्याचे आश्वासन दिले. आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांनी मोदींचे हे पाऊल देशाच्या आर्थिक विकासाला वेग देईल असे मत व्यक्त केले. त्यांच्या मते, हे एक प्रेरणादायी पाऊल आहे. उत्पादन क्षेत्राचा विकास झाल्यास देशाची अर्थव्यवस्थाही मजबूत होईल. तर विप्रोचे प्रमुख अजीम प्रेमजी यांनी मॅन्युफॅक्‍चरिंग सेक्टरचे यश जागतिक बाजारपेठेची मागणी पूर्ण करण्यात असल्याचे म्हटले.

काँग्रेसचा हल्ला
काँग्रसेने मात्र भाजपवर हल्लाबोल केला. यूपीए सरकारने 2010 मध्येच 'इनव्हेस्ट इंडिया' सुरू केले होते, असा दावा काँग्रेस प्रवक्‍ते अभिषेक मनू सिंघवी यांनी केला. गुंतवणुकीसाठी परदेशी व्यावसायिकांना आकर्षित करणे हा त्याचा उद्देश होता, असे मोदी म्हणाले.
उद्देश काय?
या योजनेचा उद्देश देशी कंपन्यांना उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी सहज सुविधा व सहकार्य मिळाव्या हा आहे. योजनेअंतर्गत विदेशी कंपन्यांना सुविधा व्हावी म्हणून अनेक प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना भारतात येऊन प्रकल्प सुरू करणे सहज शक्य होऊ शकेल. देशाला मॅन्युफॅक्चरींग पावरहाऊस बनवणे आणि जीडीपीमध्ये वाढ करणे हाही यामागील एक उद्देश आहे.

मेक इन इंडियातील महत्त्वाच्या बाबी

- या योजनेंतर्गत एक नवा सेल तयार केला जाईल. हा सेल उद्योगपतींच्या प्रश्नांवर 72 तासांत उत्तरे देईल. या सेलचे काम संपूर्ण अभियानाची निगरानी करणे हेही असेल.

- देशाला अग्रस्थानी नेण्याची शक्यता असलेल्या 25 क्षेत्रांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार देशातील 25 सेक्‍टर्समध्ये रोजगार निर्मिती करण्याची आणि कौशल्य विकास करण्याची योजना आहे. ऑटोमोबाइल्‍स, केमिकल्‍स, आयटी, फार्मास्‍युटिकल्‍स, टेक्‍सटाइल्‍स, बंदरगाह, एव्हिएशन, लेदर, टूरिझम, हॉस्‍प‍िटॅलिटी, वेलनेस, रेल्वे, ऑटो पार्टस, डिजाइन मॅन्युफॅक्‍चरिंग, माइनिंग, बायोटेक्‍नॉलॉजी, इलेक्‍ट्रॉनिक्‍स या क्षेत्रांत ही रोजगारनिर्मिती होणार आहे.
- संपूर्ण अभियानाबाबत www.makeinindia.com वर सविस्तर माहिती मिळेल.

- या अभियानांतर्गत दरवर्षी देशातील 1 कोटी लोकांना रोजगार मिळू शकेल.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित छायाचित्रे...
कार्यक्रमाचा लाइव्ह व्हिडिओ पाहा शेव टच्या स्लाइडवर....