आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदी सीक्रेट राहाण्यासाठी मोदींच्या घरी 6 जणांनी केले काम, दिली गोपनियतेची शपथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदींनी 8 नोव्हेंबरच्या रात्री 8 वाजता देशाला संबोधित करुन नोटबंदीची घोषणा केली होती. - Divya Marathi
मोदींनी 8 नोव्हेंबरच्या रात्री 8 वाजता देशाला संबोधित करुन नोटबंदीची घोषणा केली होती.
नवी दिल्ली - नोटबंदी निर्णयाला एक महिना झाला आहे. त्याचे फायदे सरकार वेळोवेळी सांगत आहे. मात्र खरी कथा निर्णय लागू करण्यापूर्वीची आहे. निर्णय गुप्त ठेवण्यासाठी नरेंद्र मोदींनी मोठी प्लॅनिंग केली होती. केंद्रीय महसूल सचिव हसमुख अढिया यांच्यासह 6 जणांची एक टीम तयार करण्यात आली होती. टीम मोदींच्या निवासस्थानी गुप्तपणे काम करत होती. अशी माहिती आहे की या टीम मधील सदस्यांना गुप्ततेची शपथ दिली गेली होती.

मोदींच्या निवासस्थानातील 2 रुममध्ये झाले पूर्ण रिसर्च
- न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, हसमुख आढिया आणि 5 अधिकाऱ्यांची यासाठी निवड करण्यात आली होती. हे सर्व लाइमलाइटपासून दूर राहाणारे होते.
- याशिवाय अधिकाऱ्यांना या प्रकरणाची पूर्ण समज होती.
- मोदींच्या निवासस्थानातील 2 रुममध्ये हे काम सुरु होते. या प्रकरणातील सर्व रिसर्च येथे झाले. मोदी सत्तेवर आले तेव्हाच (2014) त्यांनी इकॉनॉमिक रिफॉर्मवर भर दिल्याचे समजते.
पंतप्रधान मंत्र्यांना म्हणाले होते, पॉलिसी फेल झाली तर जबाबदारी माझी
- नोटबंदीचा निर्णय घेण्यापूर्वी मोदींनी कॅबिनेटची बैठक बोलावली होती. तिथे मंत्र्यांना सांगितले होते, 'नोटबंदीचा निर्णय जर फसला तर त्याची पूर्ण जबाबदारी माझी राहिल.'
केव्हा लागू झाली नोटबंदी
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबरच्या रात्री 8 वाजता देशाला संबोधित करुन नोटबंदीची घोषणा केली होती.
- त्यावेळी मोदी म्हणाले होते, आज रात्री 12 वाजतापासून 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा कागदाचे तुकडे होतील.
- त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 आणि 500 रुपयांची नोट चलनात आणणार असल्याची घोषणा केली.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...