आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दिल्ली मेट्रोतून प्रवास, पंतप्रधानांनी मेट्रोतून पहिलीच वेळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिल्ली मेट्रोतून प्रवास केला. एका कार्यक्रमात जाण्यासाठी मोदींनी धौलकुंवा - द्वारका या मार्गावरील प्रवास मेट्रोने केला. देशाच्या पंतप्रधानांनी मेट्रोतून प्रवास करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मेट्रोतून प्रवास केल्यानंतर मोदींनी त्याच्या फोटोसह ट्विटवर त्याची माहितीही दिली.

शनिवारी एका कार्यक्रमास जाण्यासाठी पंतप्रधान मोदी सकाळी १०.०५ मिनिटांनी धौलकुंआ स्टेशनवर आले. ते लगेच मेट्रोमध्ये बसले. १५ मिनिटे ते मेट्रोमध्ये होते. १० वाजून २० मिनिटांनी ते द्वारका सेक्टर २१ या स्टेशनवर उतरले. या प्रवासात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल तसेच पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. प्रवास करण्याआधी मोदींनी मेट्रो ट्रेनचे रीतसर तिकीट खरेदी केले. विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या या मेट्रो प्रवासाची दिल्ली मेट्रो रेल्वे प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना नव्हती. त्यामुळे स्टेशनवर मोदींना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला, तर अनेकांना मोदी येऊन गेल्यानंतर त्याची कल्पना आली. मोदींच्या प्रवासाच्या वेळी दोन्ही स्टेशन तसेच मेट्रोमध्ये कडेकोट सुरक्षा यंत्रणा तैनात होती.

मोदींची टि्वटरवर माहिती
मोदींनी या मेट्रो प्रवासाबाबत टि्वट करताना म्हटले की, "या प्रवासात आनंद झाला. दिल्ली मेट्रोला धन्यवाद. श्रीधरनजींना धन्यवाद.' मोदींनी लिहिले की, श्रीधरनजी मला दिल्लीत मेट्रोतून प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी अाग्रह करत असत. आज मला द्वारकेला जाताना तशी संधी मिळाली. मोदींनी टि्वटरवर काही छायाचित्रेही अपलोड केली आहेत.

आज ‘मन की बात’
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणीवर ‘मन की बात’ या कार्यक्रमात सुसंवाद साधणार आहेत. सर्व प्रादेशिक भाषांमध्ये रात्री आठ वाजता आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून मोदींचा ‘मन की बात’ कार्यक्रम प्रसारित केला जाईल. त्याचा विषय मात्र गुलदस्त्यात आहे.
अाॅलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष थाॅमस मोदींना भेटणार
नवी दिल्ली | अांतरराष्ट्रीय अाॅलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष थाॅमस बाच २ दिवसांच्या भारत दाैऱ्यावर अाहेत. थाॅमस साेमवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची भेट घेणार अाहेेत. या वेळी अागामी २०२४ च्या अाॅलिम्पिक स्पर्धेच्या अायाेजनाबाबत थाॅमस अाणि माेदी यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा हाेणार अाहे. थाॅमस हे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा भारत दाैऱ्यावर अाले अाहेत. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात अाहे.