आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pm Modi Tweets In Japanese Ahead Of His Visit To Japan

\'जसा देश तसा वेश\' जपानी भाषेत केले नरेंद्र मोदींनी ट्विट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 'जसा देश तसा वेश' या म्हणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करताना दिसत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार करताना नरेंद्र मोदी प्रचाराच्यावेळी त्या-त्या राज्यतील स्थानिक भाषेचा वापर करताना सर्वानीच पाहिले. परंतु आता मोदींचे हे वेगळेपण परकीय भाषेत देखील दिसून आले आहे.
आज (गुरुवारी) मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरुन जपानी भाषेत एकूण 8 ट्विट्स केले . ज्यातील एक ट्विट जपानचे पंतप्रधान शिंजो एबे (@AbeShinzo) यांना संबोधित केले आहे. मोदींनी या ट्विटमध्ये लिहिले आहे की, मी स्वत: जपानच्या पंतप्रधानांना भेटण्यासाठी उत्सुक आहे. तसेच, मी शिंजो एबे यांच्या नेतृत्त्वाचा सन्मान करतो. मोदी येत्या 30 ऑगस्ट पासून जपानच्या दौ-यावर जाणार आहेत.
पुढील स्लाइडवर वाचा मोदींचे जपानी भाषेतील ट्विट...