आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूफी परिषदेत \'भारत माता की जय\'चे नारे; मोदी म्‍हणाले- इस्लाम म्‍हणजे शांतता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूफी परिषदेच्‍या आयोजकांसोबत मोदी. - Divya Marathi
सूफी परिषदेच्‍या आयोजकांसोबत मोदी.
नवी दिल्‍ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथे आयोजित चार दिवसीय जागतिक सूफी परिषदेच्‍या कार्यक्रमात पोहोचले आहेत. 'ऑल इंडिया उलेमा अॅन्ड मशाईखा बोर्डा'तर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी भाषणाला सुरूवात करताच. जगभरातील उपस्‍थित सूफी सदस्‍यांनी 'भारत माता की जय' असे नारे दिले. या कार्यक्रमात पाकिस्‍तानसह 20 देशांमधील 200 पेक्षा अधिक प्रतिनीधी उपस्थित राहणार आहेत. शिवाय अनेक सूफी धर्मगुरू, विद्वानही परिषदेत सहभागी होतील. दहशतवादी हल्ला भीती..
- कार्यक्रमाच्‍या पहिल्‍या दिवसाचे सत्र विज्ञान भवनमध्‍ये होणार आहे.
- पुढे इंडिया इस्लामिक सेंटरमध्‍ये 2 दिवस व शेवटचे सत्र 20 मार्चला रामलीला मैदानावर होईल.
- सूफी परिषदेचे आयोजन ऑल इंडिया उलेमा अॅन्ड मशाईखा बोर्डाने केले आहे.
- हे बोर्ड भारतात सूफी दर्गांचे व्‍यवस्‍थापन करणारी अग्रेसर संस्‍था आहे.
- गुप्तचर संस्थांनी परिषदेत दहशतवादी हल्ला होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली.
- गुप्‍चचर संस्‍थांच्‍या माहितीनंतर पंतप्रधानांच्‍या सुरक्षेमध्‍ये वाढ करण्‍यात आली आहे.
काय म्‍हणाले मोदी..
- मोदी भाषणात म्‍हणाले, ''विविध संस्‍कृतींनी घडवलेल्‍या दिल्‍लीमध्‍ये सर्वांचे स्‍वागत आहे.''
- ते म्‍हणाले, ''येथे जगभरातील विविध देशांमधील लोक एका उद्देशासाठी एकत्र आले आहेत.''
- '' जगाला हिंसा आणि दहशतवादाने घेरले आहे. या गडद वातावरणात आपण प्रकाशाचा किरण आहात.''
- ''इजिप्त व पश्चिम आशियात सूफी परंपरेच्‍या उद्यानंतर शांती व मानवतेचा संदेश दिला गेला.''
- ''सूफी लोकांसाठी ईश्‍वराच्‍या सेवेचा अर्थ मानवतेची सेवा असा होतो.''
- ''आपण ईश्‍वरावर प्रेम करतो तर, त्‍याने बनवलेल्‍या प्रत्‍येक गोष्‍टीवर आपण प्रेम करायला हवे.''
- ''सूफी परंपरा शांती आणि समानतेचा आवाज आहे.''
- ''डोक्‍यापासून पायापर्यंत भारत शांती आणि आत्‍मियतेचे प्रतिक असलेला देश आहे.''
- ''हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन हे सर्व धर्म या देशाचा एक महत्त्वाचा भाग आहेत.''
- ''जगभरात दहशतवाद वाढत आहे. मागील वर्षी 90 हून अधिक देशात दहशतवादी हल्‍ले झाले.''
- ''दहशतवादी आपलाच देश आणि आपल्‍याच देशातील लोकांचे नुकसान करत आहेत.''
- ''काही लोक कँम्‍पमध्‍ये दहशतवादाचे प्रशिक्षण देत आहेत.''
- ''पूजेच्‍या ठिकाणी हल्‍ले केले जात आहेत. कोणता धर्म असे करण्‍यास सांगतो.''
- ''दहशतवादाचा कोणताही धर्म नाही. दहशतवादाविरोधातील लढाई ही कोण्‍या धर्माविरोधातील लढाई नाही.''
- ''एका देशावर झालेल्‍या हल्‍ल्याचा परिणाम इतर देशांवरही दिसून येतो.''
पुढील स्‍लाइड्वर क्‍लिक करून पाहा, परिषदेतील फोटो..
पुढे वाचा, किती देशांमधील लोक होणार सहभागी...