आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PM मोदींची यंदाची दिवाळी चीन बॉर्डरवर, #Sandesh2Soldiers कॅम्पेनमध्ये 10 लाख सहभागी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाची दिवाळीही बॉर्डरवरील जवानांबरोबर साजरी करत आहेत. यावेळी ते उत्तराखंडमध्ये भारत-चीन बॉर्डर परिसरात इलाके माना पोस्टवर तैनात असलेल्या आईटीबीपीच्या जवानांबरोबर असतील. शनिवार मोदी चमोली डिस्ट्रिक्टला पोहोचतील. आधी बद्रिनाथ मंदिरात दर्शन घेतील. यावेळी नॅशनल सेक्युरिटी अॅडव्हायजर अजित डोभालही त्यांच्याबरोबर असतील. दरम्यान, मोदींच्या #Sandesh2Soldiers कॅम्पेनद्वारे आतापर्यंत जवानाना 10 लाखांपेक्षा जास्त शुभेच्छा संदेश पाठवण्यात आले आहेत.

सलग तिसरी दिवाळी जवानांबरोबर
- केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. 29 तारखेला सकाळी एअरफोर्सच्या खास विमानाने मोदी गौचरला पोहोचतील.
- बद्रीनाथच्या दर्शनानंतर मोदी आयटीबीपीच्या जवानांबरोबर दिवाळी साजरी करतील. चहा-नाश्ताही येथेच घेतील.
- उत्तराखंडमध्ये चीनला लागून असलेल्या सीमेवर माना हे अखेरचे गाव आहे.
- पंतप्रधान बनल्यानंतर मोदी सलग तिसऱ्यांदा जवानांबरोबर दिवाळी साजरी करत आहेत.
- गेल्यावर्षी मोदी अमृतसरच्या खासामध्ये डोगराई वॉर मेमोरियलच्या दौऱ्यावर गेले होते तर 2014 मध्ये त्यांनी सियाचीनमधील जवानांबरोबर दिवाळी साजरी केली होती.

जवानांना शुभेच्छा पाठवण्याचे अपील
- मोदींनी गेल्या सोमवारी लोकांना विनंती केली होती की, त्यांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छांचे संदेश पाठवावे.
- महोबामध्ये एका रॅलीत मोदी म्हणाले होते, दिवाळीला जवानांना संदेश पाठवून त्यांचे मनोधैर्य वाढवावे.

काय आहे #Sandesh2Soldiers कॅम्पेन?
- मोदींनी 23 ऑक्टूबरपासून सीमेवर तैनात असलेल्या जवानांना संदेश पाठवण्याची सुरुवात केली आहे.
- #Sandesh2Soldiers हॅशटॅगसह गेल्या रविवारी मोदींनी ट्विटरवर मॅसेज पोस्ट केला होता.
- या कॅम्पेनमध्ये MyGov.in, ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनचाही समावेश करण्यात आला आहे. लष्कराबद्दल देशवासीयाच्या भावना या माध्यमातून सर्वांना समजतील.
- आतापर्यंत अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री यांनी संदेश पाठवले आहेत.
- अक्षय कुमार, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, आनंद महिंद्रा असा सेलिब्रिटींसह 10 लाखांहून अधिक लोकांनी शुभेच्छा पाठवल्या आहेत.

चीन-पाकबरोबरच्या नात्यात तणाव
- 28 सप्टेंबरला PoK मध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर भारत-पाक बॉर्डरवर तणाव वाढला आहे.
- दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात आहेत. पाक रेंजर्स सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहेत.
- चीनबरोबरही सीमेवर भारताचे संबंध फारसे चांगले नाहीत. चीनी जवानांच्या घुसखोरीचेही वृत्त अनेकदा समोर येत असते.
- एनएसजी, मसूद अझहरच्या मुद्द्यावर चीनने भारताचा विरोध केला आङे. दिवाळीची चिनी वस्तूंवर बंदी घालण्याबाबतही चीनने भारताला इशारा दिला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, मोदींनी केलेले ट्विट..
बातम्या आणखी आहेत...