आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi Will Leave For 10 Day's Australia Tour Today

मोदींचे आॅस्ट्रेलियात जंगी स्वागत होणार, आजपासून १० दिवसांचा परदेश दौरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ऑस्ट्रेलियात अमेरिकेसारखेच जंगी स्वागत होणार आहे. मोदींच्या परदेश दौ-याला मंगळवारी सुरुवात होत आहे. म्यानमार, ऑस्ट्रेलिया आणि फिजी या देशांना मोदी भेट देणार आहेत.
म्यानमारमध्ये मोदी चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांची भेट घेतील. सिडनीच्या ऑलिम्पिक पार्कमध्ये मोदींच्या स्वागताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात १५ हजारांपेक्षा जास्त लोक सहभागी होतील. तेथील भारतीय समुदायाने या कार्यक्रमाला २७ हजारांपेक्षा अधिक लोकांची उपस्थिती राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

अमेरिकेतील मेडिसन स्क्वेअरपेक्षाही हा कार्यक्रम मोठा असेल, असा दावा परराष्ट्र सचिव अनिल वाधवा यांनी केला आहे. या कार्यक्रमानिमित्त मेलबर्न ते सिडनी विशेष रेल्वे ‘मोदी एक्स्प्रेस’नावाने चालवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियात साडेचार लाख भारतीय राहतात. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबोट यांनी मोदींच्या सन्मानार्थ १६१ वर्षे जुन्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर भव्य मेजवानीचे आयोजन केले आहे.

१९८६ नंतर भारतीय पंतप्रधानांचा दौरा
मोदी ब्रिसबेन येथील जी-२० देशांच्या शिखर संमेलनात सहभागी होणार आहेत. कॅनबेरामध्ये ऑस्ट्रेलियन संसदेला ते संबोधित करतील. १९८६ मध्ये राजीव गांधींनी ऑस्ट्रेलियाला भेट दिली होती. त्यानंतर मोदीच या देशात जात आहेत. फिजीला ३३ वर्षांत एकाही भारतीय पंतप्रधानाने भेट दिलेली नाही. १९८१ मध्ये इंदिरा गांधी फिजीला गेल्या होत्या. येथील लोकसंख्येच्या ३७ टक्के लोक भारतीय आहेत.

४० पेक्षा अधिक नेत्यांची भेट घेणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौ-यात आशिया, आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि पॅसिफिक क्षेत्रातील येथील ४० हून अधिक नेत्यांची भेट घेतील.