आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचा सार्क परिषदेवर बहिष्कार, मोदी पाकला जाणार नाहीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उरीमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला एकटे पाडण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून १९ व्या सार्क शिखर परिषदेवर भारताने बहिष्कार टाकला आहे. ९ व १० नोव्हेंबर रोजी इस्लामाबादेत ही परिषद होत आहे. दरम्यान, भारताच्या या भूमिकेला प्रतिसाद देत अफगाणिस्तान, भूतान आणि बांगला देश हे सदस्य देशही बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सार्क परिषदेला उपस्थित राहणार नाहीत, असे परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केले. सार्कचे अध्यक्षपद असलेल्या नेपाळला भारताने त्याची कल्पना दिली. एका देशाने दक्षिण आशियात जे वातावरण निर्माण केले आहे ते सार्क परिषद यशस्वीतेसाठी योग्य नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. सीमापार दहशतवाद आणि शेजारी देशाच्या अंतर्गत प्रश्नांत सातत्याने ढवळाढवळ यामुळे वातावरण बिघडत चालल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. अधिकृत सूत्रांनुसार, सार्कचे सदस्य असलेले अफगाणिस्तान, बांगला देश आणि भूतान हे देशही परिषदेवर बहिष्कार टाकू शकतात. दक्षिण आशियाई विभागीय सहकार्य संघटनेत (सार्क) काश्मीर प्रश्नावरून भारत-पाकिस्तान तणाव नेहमीच कळीचा मुद्दा ठरला आहे.
बातम्या आणखी आहेत...