आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi Wished That Senior Ministers Should Distribute Work To State Ministers

\'सेकंड लाईन\' पक्की करणार, राज्यमंत्र्यांना वरिष्ठ मंत्र्यांनी कामे वाटून द्यावी अशी मोदींची इच्छा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार केला. आता वरिष्ठ मंत्र्यांनी त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या मंत्रालयाशी संबंधित कामांच्या अनुषंगाने "सेकंड लाईन' तयार करावी व कनिष्ठ मंत्र्यांकडे अर्थात राज्यमंत्र्यांकडे काही कामे सोपवावीत, असे मोदींना वाटते.

केंद्रातील एनडीए सरकारमधील मंत्र्यांची संख्या रविवारी ४५ वरून ६६ वर गेली असून यातील पंतप्रधानांसह २७ मंत्री कॅबिनेट दर्जाचे आहेत. १३ राज्यमंत्र्यांकडे स्वतंत्र कार्यभार असून उर्वरित २६ राज्यमंत्री आहेत. या सर्व राज्यमंत्र्यांकडे कामे सोपवावीत, असे मोदींचे म्हणणे आहे. मोदींचे हे निर्देश पाळण्याच्या दृष्टीने वरिष्ठ मंत्र्यांनीही लगेच कंबर कसली आहे. चौधरी वीरेंद्रसिंह यांनी ग्रामीण विकास, पेयजल आणि पंचायतराज विभागाचा कार्यभार मंगळवारी स्वीकारला. मोदींच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करून आपण कनिष्ठ मंत्र्यांकडे आपण कामे सोपवू, असे त्यांनी जाहीर केले.

कनिष्ठ मंत्र्यांचा विषय आला कुठून?
यूपीए सरकारच्या काळात अनेक राज्यमंत्र्यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. कॅबिनेट मंत्री राज्यमंत्र्यांकडे कामे सोपवत नाहीत, त्यांना किंमतही देत नाहीत असे या राज्यमंत्र्यांचे म्हणणे होते. या पार्श्वभूमीवर मोदींचे निर्देश महत्त्वाचे मानले जातात.

कब्रस्तान बरे...!
गेल्या २६ मे रोजी मोदी यांचे मंत्रिमंडळ शपथविधीसाठी सज्ज झाले तेव्हा काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी राज्यमंत्री असण्यामागची वेदना ट्विट करताना म्हटले होते की, राज्यमंत्री होणे म्हणजे कब्रस्तानात उभारल्यासारखे आहे. तेव्हा राज्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या काही मंत्र्यांना त्यांनी सल्लाही दिला होता.